Categories: Previos News

Crime : घरा समोरून जाण्याच्या कारणावरून युवकावर कोयत्याने हल्ला, दौंड च्या खानवटे गावातील घटना



|सहकारनामा|

दौंड : घरा समोरून जायचे नाही असे बजावून सुद्धा त्याच रस्त्याने जाणाऱ्या युवकास कोयत्याने जबर मारहाण केल्याची घटना तालुक्यातील खानवटे गावात घडली. तेजस कैलास ढवळे(वय 30,रा. खानवटे, दौंड) हा युवक मारहाणीत गंभीर जखमी झाला असून, तुषार मच्छिंद्र कन्हेरकर, मच्छिंद्र तुकाराम कन्हेरकर(रा. खानवटे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. घटनेबाबत दौंड पोलिसांनी दिलेली माहिती अशी,दि.30 मे रोजी सायंकाळी 7 वा. दरम्यान फिर्यादी तेजस हा दुचाकीवरून कन्हेरकर यांच्या घरासमोरून जात असताना तुषार व मच्छिंद्र कन्हेरकर यांनी त्यास अडविले व दुचाकी वरून खाली खेचत तुला किती वेळा सांगितले या रस्त्यावरून जायचे नाही असे म्हणत आता तुझ्याकडे बघतोच असे बोलून तुषार याने आपल्या हातातील कोयत्याने तेजस च्या हाता पायावर गंभीर वार केले व मच्छिंद्र यानेही तेजस ला लोखंडी गजाने मारहाण केली व दोघेही घटनास्थळावरून फरार झाले. 

घटनास्थळी जमलेल्या ग्रामस्थांनी मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तेजस यास भिगवण(ता. इंदापूर) येथील खाजगी रुग्णालयात भरती केले असून भिगवण पोलिसांनी तेजस याचा जबाब घेऊन गुन्हा दौंड पोलिसांकडे वर्ग केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी करीत आहेत.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

15 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago