Crime – मित्राचा बदला घेण्यासाठी 5 जणांकडून दोघांवर कोयत्याने ‛वार’.. एकाचा बाहेर निघाला ‛कोथळा’, हडपसर पोलिसांकडून चौघे ‛जेरबंद’



|सहकारनामा|

पुणे : डीएसके विश्व, सायकर वस्ती हडपसर पुणे येथील पडीक इमारतीचे भागात अनोळखी आरोपींनी २ इसमांवर कोयत्याने वार करून त्यातील एकाचे पोटातील आतडे (कोथळा) बाहेर काढल्याची भयंकर घटना घडली होती. या घटनेत प्रथम दर्शनी कुठलेही धागेदोरे हाती नसताना हडपसर पोलिसांनी योग्य पद्धतीने तपास करत यातील अनोळखी आरोपी निष्पन्न करत ५ जणांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दिनांक २८/०६/२०२१ रोजी रात्रौ २३.१५ वा.चे सुमारास डी.एस.के इमारतीचे समोर, सायकर वस्ती हडपसर पुणे येथे ५ ते ६ जणांच्या टोळक्याने फिर्यादी संतोष गायकवाड व त्याचा मित्र संतोष खेडकर यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने फिर्यादी यांचे पाठीत व संतोष खेडकर याचे पोटात कोयत्याने वार करून त्याची आतडी बाहेर काढून गंभिर जखमी केले होते. 

याबाबत हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं ४८४/२०२१ भादंविक ३०७.३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दाखल गुन्ह्याचे गांभिर्य ओळखून तात्काळ मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बाळकृष्ण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपासपथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी डी.एस.के इमातरीचे भागात येणारे व जाणारे लोकांचे बाबत माहीती घेवून तपास सुरू केला. दोन दिवसात आजुबाजुच्या परिसरात शोध घेवून सुध्दा काही एक माहीती मिळून आली नाही. त्यामुळे तपासाची दिशा बदलून आजुबाजुचा परिसर सोडून मांजरी व लगतचा भागात तपास करीत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार अकबर शेख व शाहीद शेख यांना मिळालेल्या गोपनीय बातमीचे आधारे सहा.पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, पोलीस उप निरीक्षक सौरभ माने, पोलीस अंमलदार प्रताप गायकवाड, प्रदीप सोनवणे, समीर पांडुळे यांनी सापळा रचून आरोपी १) अमन चॉद शेख (वय १९ वर्ष रा. धर्मविर संभाजी चौक,माळवाडी हडपसर पुणे) २) साजीद चाँद शेख (वय २२ वर्ष रा. धर्मविर संभाजी चौक,माळवाडी हडपसर पुणे) ३) आकाश गोविंद शेंडगे (वय २१ वर्ष रा. कुंजीरवस्ती, गणपती मंदिरासमोर मांजरी बुद्रुक हडपसर पुणे) ४) प्रतिक विजय माने (वय २० वर्ष रा. रोहीत वडेवालेचे पाठीमागे, मांजरी फार्म पुणे) ५) विधीसंघर्षित बालक यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे तपास केला असता, आरोपी अमन चाँद शेख याने सांगीतले की, फिर्यादी संतोष गायकवाड याचा मित्र गोट्याने सुमारे २ ते ४ दिवसापुर्वी आरोपी यांचे मित्रास मारहाण केली होती याचा राग मनात धरून फिर्यादी व त्याचा मित्र संतोष खेडकर यांचेवर जिवे ठार मारण्याचे उद्देशाने कोयत्याने वार केले असल्याचे कबुल करत नमुद आरोपी यांनी गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींना अटक करण्यात आली असुन दाखल गुन्हयाचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक विकास राऊत हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही मा.श्री.नामदेव चव्हाण, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे व मा. नम्रता पाटील, पोलीस उप आयुक्त,परिमंडळ ५ पुणे शहर, यांचे सुचना व मागदर्शनाखाली मा.श्री.कल्याणराव विधाते, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, श्री. बाळकृष्ण कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्री. राजु अडागळे, पोनि.(गुन्हे) श्री. दिगबर शिंदे पोनि (गुन्हे) यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, पोलीस उप निरीक्षक सौरभ माने, पोलीस हवालदार प्रदीप सोनवणे, प्रताप गायकवाड, गणेश क्षिरसागर, पोलीस नाईक अविनाश गोसावी, संदीप राठोड, समीर पांडुळे, पोलीस शिपाई शाहीद शेख, अकबर शेख, शशिकांत नाळे, सचिन

जाधव, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.