| सहकारनामा |
पुणे : हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक १५/०५/२०२१ रोजी सकाळी ०६.०० च्या सुमारास मगरपट्टा सिटीमध्ये एका जेष्ठ नागरीकाची वाँकिग करतेवेळी दोन तोळयाची चैन खेचून घेवून गेल्याचा गंभीर प्रकार घडला होता. सदरचा दाखल गुन्हा मगरपट्टासीटी सारख्या उच्चभ्रू सोसायटीमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था असताना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. त्यामुळे पोलिसांना संबंधित आरोपी पकडणे हे एक प्रकारे चॅलेंज होते.
दोन्ही आरोपी हे अज्ञात होते तसेच त्यांनी लाल रंगाच्या पॅशन प्रो मोटारसायकलचा वापर केला असल्याचे सी.सी.टी.व्ही फुटेजवरून निष्पन्न झालेले होते. सदर गुन्हयाचा तपास हडपसर पोलीस ठाणेकडील तपास पथके करीत होती.
त्यांनंतर दिनांक १८/०५/२०२१ रोजी सकाळी ०६.१५ च्या सुमारारा पुन्हा भोसले गार्डन येथे अज्ञात तीन इसमांनी मॉर्निंग वॉक करणा-या एका महिलेला कोयता दाखवून तिच्या गळ्यातील चैन ओढून नेण्याचा प्रयत्न केला परंतु महिलेच्या सतर्कतेमुळे त्यांचा तो प्रयत्न यशस्वी झाला नव्हता तर त्याच दिवशी सकाळी पहाटे वानवडी पोलीस ठाणेच्या हद्दीत बी.टी.कपडे रोडवर टेम्पो चालकाला कोयत्याचा धाक दाखवून टेम्पोची काच फोडून, ड्रायव्हरवर कोयत्याने वार करून त्याचा मोबाईल व रोख रक्कम चोरीस गेलेली होती.
घटनास्थळाचे फुटेज पाहीले असता त्यामध्ये तिन इसम हे लाल रंगाच्या पॅशन प्रो मोटारसायकल वरून येवून त्यांनी गुन्हा करत असल्याचे निष्पन्न झालेले होते.
या तिन्ही गंभीर गुन्हयांचे उकल करण्याचे मोठे आवाहन हडपसर पोलीसांना होते. तसेच दोन दिवसांमध्ये झालेल्या लागोपाठ घटनांमुळे जनमानसात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. मा.वरिष्ठांनी वरील गुन्हे उकल करून आरोपी अटक करून गेला माल हस्तगत करण्याच्या सुचना व केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे हडपसर पोलीस ठाणेकडील तपास पथकाचे एकुण तिन पथके तयार करून घटनास्थळावरील प्राप्त फुटेज नुसार अज्ञात आरोपींचा व लाल रंगाच्या पेंशन प्रो मोटार सायकलचा शोध घेत होते.
त्याचवेळी तपास पथकाचे पोशि शाहिद शेख, पोशि शशिकांत नाळे यांना मिळालेल्या बातमीवरून वरील गुन्हयातील संशयित वर्णनाचे जबरी चोरीचे गुन्हे करणारे तिन इसम व वापरलेली लाल रंगाचे पॅशन प्रो मोटारसायकल वरून नविन म्हाडा, हडपसर पुणे येथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली.
त्याप्रमाणे सदर परिसरात तिन्ही पथके एकत्रित करून सापळा लावला असता, मिळालेल्या बातमीतील तिन्ही संशयीत इसम हे नविन म्हाडाकडे जाणा-या रोडने येताना दिसले, त्यांना तपासपथकातील अंमलदार यांनी ओळखलेनंतर त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला परंतु ते न थांबता मोटारसायकल वरून भरधाव वेगाने जात असता पथकातील अंमलदारांने त्यांचा पाठलाग करून त्यांना न्यू इंग्लिश स्कुलजवळ पकडले.
त्यांचेकडे विचारपूस करून त्यांची नाव पत्ते विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) अभिजीत ऊर्फ दादया अशोक रणदीवे (वय २१ वर्ष रा. म्हाडा कॉलनी हडपसर पुणे) २) सतीश आण्णाजी केदळे (वय ३२ वर्ष रा. म्हाडा कॉलनी हडपसर पुणे) असे सांगून त्यांचे सोबत एक विधीसंघर्षग्रस्त बालक देखील मिळून आला त्यानंतर वरील तिन्ही संशयिताना हडपसर पोलीस ठाणे येथे घेवून जावून त्यांना विश्वासात घेवून अधिक तपास केला असता त्यांनी त्यांचा साथीदार (३) नोएल ऐलेन शबान (वय २० वर्ष रा. कोरेगाव पार्क, सर्कीट हाऊस जवळील ब्रिजखाली बंडगार्डन पुणे) यांचेसह हडपसर, वानवडी, कोंढवा, कोरेगाव पार्क, पोलीस ठाणेच्या हद्दीत पहाटेच्या वेळेस रस्त्याने जाणारे टेम्पो चालक, ट्रक ड्रायव्हर, मॉनींग वॉक करीता जाणारे इसम यांना कोयत्याचा धाक दाखवून तसेच काहींना जखमी करून त्यांचेकडून मोबाईल फोन, रोख रक्कम, असे जबरी चोरीचे गुन्हे केले असल्याचे कबूली दिली. तसेच त्यांनी हडपसर पोलीस ठाणे हद्दीत जुना म्हाडा येथे दोन ठिकाणी घरफोड्या केल्या असल्याची देखील कबूली दिलेली आहे.
तसेच वरील तिन्ही आरोपींकडून महागड्या किंमतीचे एकुण २४ चोरीचे मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले असून त्याबाबत अधिक तपास चालू आहे. वरील चारही संशयितांकडून तपासा दरम्यान खालील गुन्हे उघड झाले आहेत.
१) हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं ३६५/२०२१ भा.दं.वि.कलम ३९२,३४
२) हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं ३७३/२०२१ भा.दं.वि.कलम ३९३,३४ सह भारतीय हत्यार कायदा कलम
४,२५
३) हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं ३६८/२०२१ भा.दं.वि.क ४५४,४५७,३८०
४) हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं ३७७/२०२१ भा.दं.वि.क ४५४,४५७,३८०
५) वानवडी पोलीस स्टेशन गु.र.नं १६६/२०२१ भा.दं.वि.कलम ३९४,३४१,४२७,५०४,५०६ सह भारतीय
हत्यार कायदा कलम ४,२५
६) कोंढवा पोलीस स्टेशन गु.र.नं ३७५/२०२१ भा.दं.वि.कलम ३९२,३४१,३४
७) कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन १०२/२०२१ भा.दं.वि.कलम ३७९ नमुद आरोपींकडून वरिल गुन्ह्यातील ०४,६८,४००/- कि.रु.चे त्यामध्ये सोन्याचे दागिने, महागड्या किंमतीचे मोबाईल फोन, मोटर सायकल, एल.सी.डी.टी.व्ही. इत्यादी हस्तगत करण्यात आलेला आहे. वरील गुन्हयाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड हे करीत आहेत. आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांचेवर वेगवेगळया पोलीस ठाणेमध्ये मालमत्तेचे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी ही मा.श्री.नामदेव चव्हाण, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे व मा. नम्रता पाटील, पोलीस उप आयुक्त,परिमंडळ ५ पुणे शहर, यांचे सुचना व मागदर्शनाखाली मा.श्री.कल्याणराव विधाते, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, श्री. बाळकृष्ण कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन,पुणे शहर, श्री. राजु अडागळे, पोनि (गुन्हे) श्री. दिगबंर शिंदे पोनि (गुन्हे) यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, पोलीस उप निरीक्षक सौरभ माने, पोलीस हवालदार प्रदीप सोनवणे, प्रताप गायकवाड, गणेश क्षिरसागर, पोलीस नाईक अविनाश गोसावी, संदीप राठोड, समीर पांडुळे, पोलीस शिपाई शाहीद शेख, अकबर शेख, शशिकांत नाळे, सचिन जाधव, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.