| सहकारनामा |
पुणे :
पुणे जिल्ह्यातील ग्रामिण भागामध्ये मा.आयुक्त श्री.कांतीलाल उमाप, मा.संचालक श्रीमती उषा वर्मा, विभागीय उपायुक्त पुणे श्री.प्रसाद सुर्वे, अधीक्षक श्री.संतोष झगडे, उपअधीक्षक श्री.पाटील, श्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, तळेगाव दाभाडे विभाग, पुणे यांच्या पथकाने चिवळी गावाच्या हद्दीत, जैद वस्ती लगत, ओढ्याकाठी ता.खेड जि.पुणे येथे अवैध
हातभट्टी दारू निर्मिती केंद्रावर छापा टाकला असता त्याठिकाणी फरार आरोपी दयाराम चौधरी हा गावठी दारूची निर्मिती करत असल्याचे आढळून आले.
सदर ठिकाणी अधिक तपास केला असता तेथे ३ हजार लि. क्षमतेचे रसायनाने भरलेले दोन लोखंडी बॅरल, १ हजार लि.क्षमतेचे रसायनाने भरलेले ४ प्लास्टिक बॅरल, ३५ लि.क्षमतेचे गावठी दारूने भरलेले ७ कॅन आणि थाळी, चाटू व ६०० लि.क्षमतेचे भट्टी बॅरल असा एकूण २ लाख ८७ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला तर साबळेवाडी, कोयाळी व मरकळ गावचे हद्दीत निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, तळेगाव दाभाडे विभाग पुणे या पथकाने छापे टाकून अवैध हातभट्टी दारू निर्मिती केंद्रावर तीन गुन्हे दाखल केले आहेत.
सदर ठिकाणी छापा टाकून रु.१.५१,८००/- किंमतीचा मुद्देमाल नाश केला गेला. या कारवाईत एकूण रु.४,३९,२५०/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई मा.अधीक्षक श्री.संतोष झगडे सो, निरीक्षक नंदकुमार जाधव, उपनिरीक्षक दत्तात्रय माकर, नवनाथ
मारकड, दिपक सुपे, स्वाती भरणे, शिवकुमार कांबळे, निनाद निकम, जवान वर्ग भगवान रणसुरे, जयराम काचरा, माधव माडे, जवान नि वाहनचालक हनुमंत राऊत, यांनी सहभाग घेतला.
यातील आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (B),(E),(F) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक श्रीमती स्वाती भरणे हे करत आहेत.