Categories: Previos News

Crime : दौंडमध्ये सासऱ्याला दारू पाजून जावयाने केला जीवघेणा हल्ला, जावयासह 3 जणांवर गंभीर गुन्ह्याची नोंद



| सहकारनामा |

दौंड : दौंड शहरामध्ये सध्या सासर आणि माहेरकडील मंडळींमध्ये मारहाणीच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. दौंड शहरात नुकतीच सासूने जावयाला मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा अशीच एक घटना घडली असून यावेळी मात्र जावयाने सासऱ्याला दारू पाजून गजाने मारहाण केल्याचे समोर आले आहे. 

दौंड शहर हि सासरवाडी असणाऱ्या जावई विकी मधु वाघमारे (रा. अहमदनगर) या जावयाने आपल्या तीन साथीदारांसह दिनेश राजाराम शेळके (रा. पानसरे वस्ती, उमर मस्जिद शेजारी, दौंड)  या आपल्या सासऱ्यावर जीव घेणा हल्ला केल्याची घटना दौंड शहरामध्ये घडली आहे. 

या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सासऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून दौंड पोलिसांनी जावई व तीन अनोळखी व्यक्ती यांच्या विरोधात भा. द.वि.कलम 326,34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनेश शेळके यांना तीन अनोळखी व्यक्तींनी फिर्यादीस आम्ही या ठिकाणी नवीन आहोत येथे दारू कोठे मिळते असे विचारले व आमच्या सोबत चला म्हणून दारू अड्ड्यावर नेऊन दारू पाजली. दारू पिऊन झाल्यावर आम्हाला अंघोळ करावयाची आहे नदीवर घेऊन चल म्हणून फिर्यादीस पानसरे वस्ती नजीकच्या भीमा नदी पात्रावर घेऊन गेले. 

तेथे त्यांनी फिर्यादीस आणखीन दारू पाजली दरम्यान फिर्यादीचा मोठा जावई विकी वाघमारे हा हातात लोखंडी गज घेऊन त्या ठिकाणी आला, त्याने व तिथे आधीच उपस्थित असलेल्या त्याच्या तीन साथीदारांनी मिळून दिनेश शेळके यांना गंभीर मारहाण केली. घटनेचा पुढील तपास पो. हवा.गावडे करीत आहेत.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

6 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

19 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

21 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

23 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago