Categories: Previos News

Crime : दौंड पोलिसांची दारू भट्टीवर मोठी कारवाई, 31 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल नष्ट

|सहकारनामा|

दौंड : दौंड पोलीसांनी अवैध दारू भट्टीवर मोठी कारवाई करत सुमारे १० बॅलर मधील १५०० लिटर रसायन आणि इतर असा ३१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला आहे.

दौंड तालुक्यातील मलठण गावच्या हद्दीत दिनांक २२/०५/२०२१ रोजी चव्हाण वस्ती येथे ओढयाच्या कडेला काटवाणात आरोपी निलेश जगन्नाथ लोंढे (रा.ज्योतीबानगर ता.दौंड जि.पुणे) हा अंदाजे २०० लिटर मापाचे १० प्लॅस्टीकचे बॅलर त्यामध्ये १५०० लिटर भरलेले कच्चे रसायन व ५०० लिटर मापाची एक लोखंडी पत्र्याची टाकीचा वापर करून हातभट्टी दारूची भट्टी लावून – दारू काढत आहे अशी खात्रीशिर माहीती पोलीस निरीक्षक नारायण पवार  यांना मिळाली होती.

हि माहिती मिळताच त्यांनी पोलीस उपनिरीक्षक सुशिल लोंढे, पो.कॉ करे, पो.कॉ.राउत यांच्यासह या ठिकाणी छापा टाकला असता आरोपीस पोलीसांची चाहूल लागताच पळून गेला आहे.

सदर ठिकाणाहून एकूण ३१,५००/- रूपयांचा मिळालेला माल जागीच नष्ट करण्यात आला असून दौंड पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नंबर २७१/२०२१ मुंबई प्रोव्हीबीशन कायदा कलम ६५(फ) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. गुन्हयाचा पुढील तपास पो.ना वलेकर हे करीत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख, अपर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

17 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago