दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)
दौंड तालुक्यातील मळद गावाजवळ पुणे सोलापूर हायवेनजीक असणाऱ्या वृंदावन हॉटेल जवळून दोन दुचाकी स्वारांनी सुमारे 30 लाख रुपयांची रोकड लुटल्याची गंभीर घटना काही वेळापूर्वी घडली आहे. याबाबत दौंड पोलिसांनी नागरिकांना आवाहन करून पल्सर गाड्यांवर असणारे युवक कुणाला आढळल्यास त्वरित दौंड पोलिसांना खबर देण्याचे आवाहन केले आहे.
दुचाकी स्वारांनी लुटलेली 30 लाख रुपयांची रोकड हि एका पोल्ट्रीफार्मची असल्याची माहिती मिळत असून दौंड पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेवर त्वरित मेसेज सेंड केल्याने आरोपींनी वापरलेली यातील एक पल्सर मोटार सायकल महामार्गावर टाकून तेथून पळ काढला असल्याचे सांगण्यात येत आहे.
याबाबत दौंडचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी त्वरित पोलीस यंत्रणा सतर्क करून आरोपींचा शोध सुरू केला आहे, तसेच पल्सर मोटार सायकलवर कुणी संशयित युवक आढळून आल्यास त्वरित पोलिसांना संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.