Categories: Previos News

CRIME : दिवंगत पत्रकाराच्या वृद्ध माता-पित्याचे 3 तोळे सोन्याचे दागिने लुटले, वाल्हे येथील धक्कादायक घटना

वाल्हे : सहकारनामा ऑनलाईन (सिकंदर नदाफ) 

पुरंदर तालुक्यातील समाजवादी विचारसरणी लाभलेल्या वाल्हे गावात अज्ञात चोरट्यांनी दिवसाढवळ्या एका दिवंगत पत्रकाराच्या घरात घुसून सुमारे ३ तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला असल्याची घटना उघडकीस आली आहे.

याबाबत घटना स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार वाल्हे येथील दिवंगत पत्रकार रोहिदास भोसले यांच्या घरात आज सकाळी सात वाजल्याच्या सुमारास तोंडाला मास्क लावलेल्या दोन अज्ञात इसमांनी मित्रत्वाची ओळख भासवून त्यांच्या घरात प्रवेश मिळवला. त्यानंतर दिवंगत पत्रकाराच्या वृद्ध आईला विश्वासात घेऊन आमच्याही आज्जीला तुम्ही बनवलेल्या  सोन्याच्या  दागिन्यांसारखेच दागिने बनवायचे आहेत असे सांगून त्यांना त्यांच्याच कपाटातील दोन तोळ्याची सोन्याची भोरमाळ व १ तोळ्याचे मनी मंगळसूत्र असे दागिने काढावयास लावले. मात्र दागिने हातात आल्यावर अज्ञात चोरट्यांनी बोलता-बोलता अचानकपणे दुचाकीवर स्वार होऊन धूम ठोकली.

या घटनेचे वृत्त कळताच वाल्हे पोलीस दूरक्षेत्राचे हवालदार हनुमंत गार्डी, भानुदास जगदाळे, समीर हिरगुडे पोलीस मित्र तानाजी भुजबळ तसेच महर्षी वाल्मिकी वारकरी सेवा संघाचे ह.भ.प.अशोक महाराज पवार, भाऊसो चव्हाण रामचंद्र पवार आदींनी घटना स्थळी भेट दिली.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

12 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago