क्राईम

वाहनांतून डिझेल चोरी करणा-या आंतरराज्य टोळीतील म्होरक्या जेरबंद, 14 लाख रुपयांचा मुददेमाल जप्त

पुणे/दौंड :
रात्रीच्या वेळी उभ्या असलेल्या वाहनांमधून डिझेल चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला यवत पोलिसांनी जेरबंद केले असून या कारवाईत सुमारे १४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक ३०/०८/२०२१ रोजी पारगाव (ता.दौड)या गावच्या हददीतुन फिर्यादी सचिन आरूण बोत्रे (रा. पारगाव ता. दौड जि.पुणे) यांच्या ट्रकच्या टाकीचे झाकन खोलुन त्यातील ५०० लिटर डिझेल अज्ञात चोरट्यांनी चोरी केले होते. या बाबत यवत पोलीस स्टेशन येथे डिझेल चोरी झालेबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या भागात दिवसेंदिवस ट्रक मधील डिझेल चोरीचे गुन्हयामध्ये वाढ होत असल्याने मा. पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी सदर डिझेल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत सुचना केल्या होत्या. त्याप्रमाणे अपर पोलीस अधीक्षक श्री.मिलींद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.राहुल धस, यांचे मार्गदर्शनाखाली मा पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी पोसई/पदमराज गंपले, सहा.फौज/जयसिंग जाधव, पोहवा/निलेश कदम, पोहवा/गुरूनाथ गायकवाड, पोना/महेंद्र चांदणे, पोना/रामदास जगताप, पोना/विकास कापरे, पोना/विशाल जाधव, पोशि/राहुल गडदे, पोशि/गणेश भापकर, पोशि/भारत भोसले, पोशि/निखिल रणदिवे, पोशि/मारूती बाराते, यांचे पथक तयार करण्यात आले होते. सदरच्या पोलीस पथकांनी यापुर्वीचे रेकाॅर्ड वरील गुन्हेगारांची माहीती घेण्यास सुरवात केली होती. दिनांक ०७/१०/२०२१ रोजी पोलीस स्टाफला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली त्या अनुषंगाने राजविर गजराजसिंग मल्होत्रा, (वय 36 वर्षे, सध्या रा गावडेवाडी केसनंद बंगला नं 5, ता हवेली, जि पुणे मुळ रा.दिल्ली) यास ताब्यात घेवुन त्याचेकडे डिझेल चोरी बाबत चैकशी केली असता सुरवातीला तो उडवा उडवीची उत्तरे देवु लागला त्यावेळी पोलीस स्टाफने त्यास पोलीस खाक्या दाखवताच त्याने त्याचे इतर साथीदार
1) कालिया उर्फ बासीर रूत्तम खान, (रा वार्ड नं 14 गडरोली मकसाई शहाजापुर मध्य प्रदेश) 2) ईशान उर्फ इशक मेव (रा 2817 भैरूवाला उजैन मध्य प्रदेश)
3) आज्जु उर्फ आशिक हुसेन महम्मद हुसेन (रा 231/1जबरान काॅलनी बेगमबाग उज्जैन मध्य प्रदेश)
4) फिरोज उर्फ भटटा उर्फ शैकत कालु शहा (रा वार्ड न 14 मकसाई गडरोली मोहला साहजापुर मध्ये प्रदेश) यांचे मदतीने यवत परिसरामध्ये थांबलेल्या ट्रक मधुन डिझेल चोरी केल्याचे सांगितले.
राजविर गजराजसिंग मल्होत्रा याने त्याचे साथीदारासह यवत पोलीस स्टेशन हददीत पारगाव, बोरीपार्धी, वरवंड, कासुर्डी, यवत, वाखारी, या भागात ट्रक मधुन डिझेल चोरी केल्याचे सांगितले असुन सदर आरोपीकडुन यवत पोलीस स्टेशन हददीतील डिझेल चोरीचे 10 गुन्हे उघडकिस आणण्यात आले आहेत, तसेच सुमारे 1000 (एक हजार) लिटर डिझेल, एक ग्रे रंगाची इंडिवर जीप नं एम एच १४ ए एल ०००१, एक चाॅकलेटी रंगाचा आयशर टेम्पो नं आर जे ४० जी ए ०३३९ असा एकुण १४ लाख रूपये किमंतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला असुन यवत पोलीस स्टेशनने आंतरराज्य डिझेल चोरी करणारी टोळी निष्पन्न केली आहे.
सदर आरोपींकडुन जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असुन पुढील तपास मा.पोलीस निरीक्षक श्री. नारायण पवार यांचे मार्गदर्शनाखाली सहा.फौज/जयसिंग जाधव हे करीत आहेत.

Team Sahkarnama

View Comments

  • पारगाव येथील युवकांचे धाडस.
    पकडली आंतरराज्य टोळी.
    पारगाव येथील युवकांनी धाडसाने आंतरराज्य डिझेल चोरी करणारी टोळी पकडुन पोलिसांच्या ताब्यात दिली आहे.
    झालेली घटना
    पारगाव सा.मा. तालुका दौंड येथील ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करणारे सचिन अरुण बोत्रे यांचा मालवाहतूक करणारा ट्रक पारगाव येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंप येथे डिझेल भरून बेळगाव येथे जाण्यासाठी उभा असताना 21 सप्टेंबर रोजी पहाटे 2 च्या सुमारास एक आयशर कंपनीचा टेम्पो शेजारी येवून उभा राहिला आणि ट्रक मधून सुमारे 45000 रुपये किमतीचे 500 लिटर डिझेल चोरून नेले. सी सी टी वी मध्ये संपूर्ण घटना कैद झाली. सदरची तक्रार यवत पोलीस स्टेशन मध्ये नोंदवण्यात आली. या नंतर दिनांक 7 ऑक्टोबर रोजी सदर संशयित टेम्पो पारगाव चौकातून जाताना सचिन बोत्रे यांना दिसला आता त्यांनी त्वरित पारगाव मधील पोलीस मित्र वैभव बोत्रे यांना सांगितले. वैभव बोत्रे यांनी त्वरित केडगाव पोलिस स्टेशन चे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पद्यराज गंपले यांना सूचित करून सदर टेम्पो चा पाठलाग केला असता टेम्पो ड्रायव्हर ने टेंपो अंगावर घालण्याचा प्रयत्न केला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु वैभव बोत्रे यांनी धाडसाने सदर टेम्पो चारचाकी गाडी आडवी लावून अडवण्यात यश मिळवले.परंतु टेम्पो मधील लोक उड्या टाकून उसाच्या शेतात फरार झाले. टेम्पो पोलिसांच्या ताब्यात देण्याकरिता चालवला असता सदर टेम्पो चा पाठलाग एक आलिशान 4 व्हीलर गाडी करत असल्याचे वैभव बोत्रे यांच्या लक्षात आले. त्यांनी त्वरित त्याची कल्पना पोलीस उपनिरीक्षक गंपले यांना दिली असता त्यांनी त्वरित त्यांचे पथक पाठवले. सदर ची आलिशान गाडी जोगेश्वरी मिसळ पारगाव या हॉटेल जवळ स्थानिक युवकांनी अडवली आणि त्या गाडीमधील लोकांना पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी चौकशी केली असता आंतरराज्य डिझेल चोरी मध्ये ते सहभागी असल्याचे आढळले. या कामी पारगाव येथील पोलिस मित्र वैभव बोत्रे , राहुल टिळेकर, निलेश धुमाळ , विक्रम शिंदे, प्रशांत शिंदे,सागर बोत्रे यांनी अतिशय धाडसाने आंतरराज्य टोळी पकडुन देण्यात मोलाचे सहकार्य केले. असा खरा प्रकार असताना पोलिसांनी सगळे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. अशाने लोक पोलिसांना सहकार्य कसे करणार..??

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

10 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

23 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago