यवत : सहकारनामा ऑनलाईन(जीवन शेंडकर)
दौंड तालुक्यातील बोरीऐंदी गावात गुरुवार दि.९ रोजी सायंकाळी यवत पोलिसांनी धाड टाकून दारू बनवणारे साहित्य नष्ट केले आहे.
ही कारवाई यवतचे पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी लोणकर आणि हेमंत कुंजीर यांनी बोरीऐंदीचे पोलिस पाटील म्हेत्रे यांच्या मदतीने सापळा रचून केली असून बोरीऐंदी (दौंडकर मळा) येथील दारू भट्टीवर धाड टाकून पूर्ण दारू भट्टी नष्ट करण्यात आली आहे. दारू बनवणारे दोन तरुण पोलिसांची चाहूल लागताच तेथुन पळून गेले. दारू भट्टीच्या ठिकानी सुमारे ऐंशी हजाराच्या भिजत घातलेल्या दारूच्या रसायन नष्ट करण्यात आले आहे. बोरीऐंदी गावात बर्याच दिवसांपासून दारू हातभट्टी व्यवसाय सुरू आहे. पंचक्रोषितील बरीच तरुण पिढी या दारूमुळे बिघडलेली दिसत आहे. देशात सध्या संचारबंदी लागू असताना देखील हा दारु व्यवसाय चालतो कसा, यांना कोणाचा पाठिंबा आहे? असे प्रश्न गावातील ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. या घटनेतील पुढील तपास यवत पोलिस करत आहेत.