Crime – स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून मोटारसायकल चोर जेरबंद 2लाख 20 हजार रु किंमतीच्या 5 मोटारसायकल जप्त



|सहकारनामा|

पुणे : स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या बातमी वरून इसम अक्षय नितीन काळे (वय  20 वर्षे रा गणेगाव दुमला ता शिरूर) व त्याचा साथीदार प्रशांत सतीश भोसले (वय 20 वर्षे रा खोरवाडी  ता.दौंड) हे  दोघेेेजण चोरीच्या मोटारसायकल विक्री करत असले बाबत LCB टीम ला माहिती मिळाली होती. या माहितीवरून दौड पोलिस स्टेशन हद्दीत काष्टी रोडवर पोलिसांनी सापळा रचून वरील  दोन इसमास ताब्यात घेतले असता त्यांनी 5 मोटारसायकल चोरी केल्याचे सांगितले.

त्यातील 4 गाड्या त्यांनी  व्यंकटेश या व्यक्तीस विकल्याचे  सांगितले . त्यावरून इसम व्यंकटेश फ्ररराव कंटसाला (वय 27 सध्या रा खातगाव भिगवण जि पुणे मूळ रा अगडालंका वेस्ट गोदावरी राज्य आंध्र प्रदेश) यास पोलिसांनी ताब्यात घेतले असता वरील 3 आरोपी कडून खालिल प्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

१) दौड पो स्टे गु र नं 306/2021 भा द वी 379 यातील चोरीस गेलेली हिरो होंडा पॅशन किंमत रु 20,000

२) वालचंद नगर पो स्टे गु र नं 487/2020  भा द वी 379 चोरीस गेलेली होंडा युनिकॉर्न किंमत रु  40,000 

3) श्रीगोंदा पो स्टे गु र नं 176/2021  भा द वी 379 चोरीस गेलेली होंडा युनिकॉर्न किंमत रु  40,000 

4) दौड पो स्टे हिरो होंडा स्प्लेडर  किंमत रु 20,000

 5) शिरूर पो स्टे रॉयल एनफिल्ड बुलेट किंमत रु 1लाख  असा एकूण 2 लाख 20हजार रु किंमतीचा वरील वर्णनाचा मुद्देमाल व आरोपी वैद्यकीय तपासणी करून पुढील तपास कामी दौंड पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.

सदरची कामगिरी ही पोलिस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख अप्पर पोलिस अधिक्षक

श्री मिलिंद मोहिते उपविभागीय पोलिस अधिकारी दौड विभाग श्री राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट 

पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, पो ना विजय कांचन, पो ना राजू मोमिन, पो कॉ अमोल शेडगे, पो कॉ मंगेश भगत, पो कॉ बाळासाहेब खडके, पो कॉ धिरज जाधव,  पो कॉ पूनम गुंड, पो कॉ दगडू विरकर यांनी केली आहे.