Crime : भिगवण येथे चोरीचे 2 ट्रक विक्री करण्यास आलेले 2 जण LCB कडून जेरबंद



|सहकारनामा|

इंदापूर : भिगवण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 20 लाखाचे दोन चोरीचे ट्रक विक्री करण्यास आलेल्या 2  इसमांना  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेेेरबंद केेले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकास गोपनीय बातमीदार मार्फत मिळालेल्या माहिती वरून भिगवण पोलिस स्टेशन हद्दीत 2 चोरीचे ट्रक विक्री करण्यास येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहिती वरून सदर ठिकाणी नाकबंदी करून  पिवळ्या रंगाचा टिपर  एक ठिकाणी संशयितरित्या येताना दिसला त्यावेळी सदरचे वाहन चेक केले असता इसम पैगंम्बर सिकंदर शेख (वय 31वर्षे रा मिरज पंधरपूर रोड, तासगाव फाटा ता मिरज जि सांगली)  याने आणि त्याचा मित्र अशोक बबन निळे (वय 30 वर्षे रा वसपेठ ता जत जि सांगली)  यांनी ते वाहन आणल्याचे समजले.  

वरील दोन जण ताब्यात घेतले असता चौकशी केल्यावरून समजले की सदरचा टिपर हा कर्नाटक येथून चोरून आणला आहे. तसेच अशोक बबन निळे  याचेकडे एक 10 चाकी ट्रक बनावट नंबर टाकून चालवत असल्याचे माहिती मिळाली सदरचा ट्रक ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली असता मूळ नंबर हप्ते थकले वरून त्याने इसम मुस्तफा शेख पूर्ण नाव माहिती नाही (रा सोलापूर) याचेकडून सदरच्या 10 चाकी ट्रक चा चेसिस नंबर बदलून तसेच वाहन रजिस्टर क्रमांक बदलून शासनाची फसवणूक करून वापरत असल्याचे मिळून आले. 

सदर बाबत भिगवण पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलं असून एक पिवळ्या रंगाचा 6 चाकी टिपर किंमत रु.10लाख, एक 10 चाकी टाटा ट्रक किंमत रु.10 लाख असा एकूण 20 लाख रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपी आणि मुद्देमाल पुढील तपास कामी भिगवण पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे .

सदरची कारवाई ही मा पोलिस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते पोलीस उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट ,

भिगवण पोलिस स्टेशन प्रभारी अधिकारी जीवन माने पो स ई  शिवाजी ननवरे

पो ना विजय कांचन , पो ना समीर करे, 

पो कॉ अमोल शेडगे, पो कॉ मंगेश भगत, 

पो कॉ धिरज जाधव, पो कॉ अंकुश माने, 

पो कॉ दगडू विरकर यांनी केली आहे.