Categories: Previos News

Crime – पोलिसांच्या वेशात येऊन दरोडेखोरांचा ज्वेलर्सवर गोळीबार करून सोने लुटण्याचा प्रयत्न, खेड शिवापूर जवळील धक्कादायक घटना



पुणे : सहकारनामा ऑनलाईन

दरोडेखोरांनी विविध पद्धतीने दरोडे टाकल्याचे आपण बातम्यांमधून वाचत असतो मात्र दरोडेखोरांनी चक्क पोलिसांच्या गणवेशात येऊन सराफावर गोळीबार करत दरोडा घातल्याची धक्कादायक घटना खेड शिवापुर येथे घडली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार खेड शिवापूरच्या कापूरहोळ या गावानजीक ही घटना घडली असून येथील बालाजी ज्वलर्स नावाच्या दुकानात हा प्रकार घडला आहे. 

सायंकाळी साधारण 5:30 च्या सुमारास एक स्विफ्ट कारमधून काही दरोडेखोर हे पोलिसांचा  गणवेश घालून बालाजी ज्वेलर्स या दुकानात आले. यावेळी त्यांनी दुकानाची पाहणी करून माहिती घेण्याचा प्रयत्न केला त्यानंतर त्यांनी दुकानातील सोने लुटण्याचा प्रयत्न करताच दुकानातील कामगाराने त्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी चिडलेल्या दरोडेखोरांनी त्या ठिकाणी गोळीबार केला मात्र दैव बलवत्तर म्हणून त्यामध्ये कुणाला इजा झाली नाही हे विशेष. या घटनेनंतर हे दरोडेखोर पसार झाले.

या घटनेत दरोडेखोरांनी नेमके किती सोने लुटून नेले हे मात्र समजू शकले नाही, सध्या याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

दरोडेखोरांनी गोळीबार केल्याचे समजताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन सर्व बाजूंनी नाकाबंदी केली. LCB टीमनेही या ठिकाणी भेट देत दरोडेखोरांचा शोध सुरू केला आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

21 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago