दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)
घरगुती वादातून चुलता आणि त्याच्या मुलांनी स्वतःच्या सख्ख्या चुलत भावाचा पाय कुऱ्हाडीच्या एका झटक्यात नडगीच्या खालून तोडून टाकत नंतर तोडलेला पाय घेऊन तो उसाच्या शेतात फेकून दिल्याची भयानक घटना दौंड तालुक्यातील कोरेगाव भिवर येथे घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या घटनेतील फिर्यादी लक्ष्मण उर्फ अप्पा भाऊ काळे (वय 50, रा.कोरेगाव भिवर, ता.दौंड. जि.पुणे व्यवसाय शेती) हे त्यांच्या राहत्या घरात बसले असताना त्या ठिकाणी आरोपी १) दादा भाउ काळे २) धुळा दादा काळे ३) बाबु दादा काळे ४) नाना प्रभु बर्वे ५) बाबु ज्ञानोबा कुलाळ ६) प्रताप ज्ञानोबा कुलाळ यांनी बेकायदेशीरपणे जमाव जमवुन फिर्यादी यांच्या राहत्या घरात घुसुन त्यांना व त्यांच्या मुलीस कु-हाडीने व लोंखडी कुदळीने वार करुन गंभीर जखमी केले. त्यानंतर त्यांचा मुलगा भिवा काळे यास जिवे मारण्याच्या उददेशाने डाव्या पायाचा नडगी पासुन खालील भाग कुऱ्हाडीने तोडून तो पाय उसाचे शेतात फेकुन देत फिर्यादी यांच्याकडील रोख रक्कम 1 लाख 32 हजार घेवुन निघुन गेले.
या गंभीर घटनेनंतर लक्ष्मण उर्फ आप्पा भाउ काळे (वय ५० वर्षे व्यवसाय शेती ता. दौड. जि.पुणे) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून यवत पोलिसांनी आरोपी १) दादा भाउ काळे २) धुळा दादा काळे ३) बाबु दादा काळे ४) नाना प्रभु बर्वे ५) बाबु ज्ञानोबा कुलाळ ६) प्रताप ज्ञानोबा कुलाळ यांच्या विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न व जबरी मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे हे करीत आहेत.