Categories: Previos News

Crime – म्हणून ‛त्या’ चिमुकल्याचा खून! फलटण मधील त्या चिमुकल्याचा खुनी जेरबंद



पुणे/सातारा : सहकारनामा ऑनलाइन

फलटण तालुक्यातील काळज येथील अपहरण झालेल्या ओम भगत या चिमुकल्याचा मृतदेह जवळील विहरित आढळल्यानंतर त्याचा खून झाल्याचे समोर  आले आणि त्यानंतर तपासाची वेगवान सूत्र फिरली आणि काही तासात लोणंद पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. 

काळज ता.फलटण येथील दहा महिन्याच्या  बाळाचे अपहरण झाल्यानंतर मंगळवारी अपहरण झालेल्या दहा महिन्याच्या बाळाचा मृतदेह विहरीत आढळून आला आणि सातारा जिल्यात एकचं खळबळ उडाली.

या बाळाच्या खुनामागील कारणही तितकेच भयानक असून मृत बाळाच्या आईवर एका तरुणाने एकतर्फी प्रेम करून ती महिला त्याला प्रतिसाद देत नाही, वारंवार प्रयत्न करूनही ती त्याच्याशी बोलतं नाही, या रागातून या आरोपीने तिच्या मुलाचा खून केल्याची कबुली दिली असल्याचे समोर आले आहे.

लोणंद पोलिसांनी या घटनेचा विविध अंगांनी तपास केल्यानंतर या खुनामध्ये हा आरोपी निष्पन्न झाला आहे. अगोदर उडवा उडवीची उत्तरे दिल्यानंतर पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. 

लोणंद पोलीस ठाण्याचे संतोष चौधरी यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील, उपविभगागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांच्या मार्गदर्शखाली आणि  सातारा गुन्हेशोध पथकाचे सर्जेराव पाटील आणि तसेच खंडाळा पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड व सर्व सातारा पोलिसांच्या टीमच्या सहकार्याने या गुन्ह्याचा छडा लावण्यात यश आले आहे.

Sahkarnama

Recent Posts

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ कार्य, संस्कारांची दिली पावती

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ संस्कारांची दिली पावती

12 तास ago

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

2 दिवस ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

3 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

4 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

4 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

4 दिवस ago