पुणे/सातारा : सहकारनामा ऑनलाइन
फलटण तालुक्यातील काळज येथील अपहरण झालेल्या ओम भगत या चिमुकल्याचा मृतदेह जवळील विहरित आढळल्यानंतर त्याचा खून झाल्याचे समोर आले आणि त्यानंतर तपासाची वेगवान सूत्र फिरली आणि काही तासात लोणंद पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
काळज ता.फलटण येथील दहा महिन्याच्या बाळाचे अपहरण झाल्यानंतर मंगळवारी अपहरण झालेल्या दहा महिन्याच्या बाळाचा मृतदेह विहरीत आढळून आला आणि सातारा जिल्यात एकचं खळबळ उडाली.
या बाळाच्या खुनामागील कारणही तितकेच भयानक असून मृत बाळाच्या आईवर एका तरुणाने एकतर्फी प्रेम करून ती महिला त्याला प्रतिसाद देत नाही, वारंवार प्रयत्न करूनही ती त्याच्याशी बोलतं नाही, या रागातून या आरोपीने तिच्या मुलाचा खून केल्याची कबुली दिली असल्याचे समोर आले आहे.
लोणंद पोलिसांनी या घटनेचा विविध अंगांनी तपास केल्यानंतर या खुनामध्ये हा आरोपी निष्पन्न झाला आहे. अगोदर उडवा उडवीची उत्तरे दिल्यानंतर पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
लोणंद पोलीस ठाण्याचे संतोष चौधरी यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील, उपविभगागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांच्या मार्गदर्शखाली आणि सातारा गुन्हेशोध पथकाचे सर्जेराव पाटील आणि तसेच खंडाळा पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड व सर्व सातारा पोलिसांच्या टीमच्या सहकार्याने या गुन्ह्याचा छडा लावण्यात यश आले आहे.