Categories: Previos News

Crime : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून फरार असलेल्या आरोपीला राहू मधून अटक



दौंड : सहकारनामा ऑनलाइन

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून अडीच वर्षे फरार असलेल्या आरोपीला राहू ता.दौंड येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (LCB) ने सापळा रचून अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दि.08/07/2018 ते दि 10/07/2018  दरम्यान शिरुर गावचे हद्दीत फिर्यादीच्या पीडित मुलीसोबत आरोपी भाऊ खोमणे याने वारंवार जबरी संभोग केला होता. त्याबाबत शिरुर पोलीस स्टेशनमध्ये 19/07/2018 रोजी दाखल करण्यात आला होता. 

सदर गुन्ह्यातील आरोपी भाऊ उर्फ दगडू सुरेश खोमणे (वय 27 वर्षे, रा राहू ता.दौंड, जि पुणे) हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. सदरचा आरोपी हा दि 07/12/2020 रोजी राहू गाव परिसरात येणार असल्याची माहिती LCB च्या तपास पथकाला मिळाली होती. त्याअनुषंगाने सापळा  रचून त्यास ताब्यात घेण्यात आले. सदर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून शिरुर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.

सदरची कामगिरी ही पुणे ग्रामिण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग मिलिंद मोहीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहा फौजदार दत्तात्रय गिरमकर, पोना मंगेश थिगळे, पोना जनार्दन शेळके, पोना अजित भुजबळ, पोना राजू मोमीन यांनी केली.

Sahkarnama

Recent Posts

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

12 तास ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

2 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

3 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

3 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

3 दिवस ago