Categories: Previos News

Crime : जबरी चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस दौंड पोलिसांनी ठोकल्या बेड्या



दौंड : सहकारनामा (अख्तर काझी)

जबरी चोरीच्या गुन्ह्यामध्ये फरार असलेल्या अट्टल गुन्हेगारास दौंड पोलिसांनी जेरबंद केले आहे. 

सागर संदिपान शिंदे(रा. शिवतेज नगर, बिबवेवाडी, पुणे.) असे अटक आरोपीचे नाव आहे. या  बाबत दौंड पोलिसांनी अशी माहिती दिली की, खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरून दौंड पोलिसांनी सागर या अटल गुन्हेगारास पुणे येथून अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले. 

तपासा  दरम्यान पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुन्हा कबूल करीत गुन्ह्यात सामील असलेल्या आपल्या साथीदारांची हि नावे पोलिसांना दिली आहेत. यवत, लोणी काळभोर, बारामती, भिगवण, इंदापूर तसेच अहमदनगर जिल्ह्यातही या टोळीने अशाच प्रकारचे गुन्हे केले असून त्याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती दौंड पोलिसांनी दिली. 

पुणे जिल्हा ग्रामीण चे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उप विभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप. निरीक्षक विजय वाघमारे, पो.हवा. मलगुंडे, पो. कॉ. विशाल जावळे, आदेश राऊत, किरण चंदनशिवे यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली आहे.

Sahkarnama

Recent Posts

दौंड च्या पोलीस निरीक्षक पदी गोपाळ पवार यांची नियुक्ती

दौंडच्या पोलीस निरीक्षक पदी गोपाळ पवार यांची नियुक्ती

10 तास ago

निवडणुकी पुरते बाहेर पडणाऱ्या सिजनेबल पुढाऱ्यांकडे दुर्लक्ष करा | कुणाला काही टिका करू द्या, आपण आपल्या कामातून त्यांना उत्तरं देऊ – आमदार राहुल कुल

निवडणुकी पुरते बाहेर पडणाऱ्या सिजनेबल पुढाऱ्यांकडे दुर्लक्ष करा | कुणाला काही टिका करू द्या, आपण…

19 तास ago

प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांचा उद्या पिंपळगाव येथे मेळावा

प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांचा उद्या पिंपळगाव येथे मेळावा

2 दिवस ago

पिडीसीसी बँकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : मा.अध्यक्ष रमेश थोरात

पिडीसीसी बँकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : मा.अध्यक्ष रमेश थोरात

3 दिवस ago

दौंडमध्ये तुतारीनं रणशिंग फुकलं.. प्रचार दौऱ्यांना सुरुवात

दौंडमध्ये तुतारीनं रणशिंग फुकलं.. प्रचार दौऱ्यांना सुरुवात

3 दिवस ago