Crime – यवत जवळ टेम्पोतून 1 लाख 17 हजारांची रक्कम चोरट्यांनी पळवली



– सहकारनामा

दौंड : दौंड तालुक्यातील यवत जवळ असणाऱ्या कासुर्डी च्या रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ एका टेम्पोतून सुमारे 1 लाख 17 हजार 400 रुपयांची रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून घेऊन गेल्याची घटना घडली आहे. 

याबाबाबत सचिन महादेव पट्टेवाड (रा.हाडोळती ता.अहमदपूर जि.लातूर) यांनी फिर्याद दिली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी हे सोमवार दि. १२/०४/२०११ रोजी सायं ६ वाजता  रामवाडी त्यांच्या ताब्यातील आयशर कंपनीचा टेम्पो नं. एम. एच. ०४ जी.आर. ७६३५ यामध्ये व्यापारी सुरेंद्रभाऊ गोडभरले यांची कोथिंबीर घेऊन ती वाशी येथे खाली करणे करीता त्यांच्या मामा सोबत गेले होते. वाशी येथे कोथिंबीर देऊन त्याची आलेली रक्कम व गाडीभाडे अशी एकूण 1 लाख 27 हजार 400 रु. रक्कम घेऊन ती टेम्पोच्या केबिन मध्ये असणाऱ्या ड्रॉवरमध्ये ठेऊन पुन्हा गावाकडे निघाले होते. 

मुंबईवरून पुणे आणि येथून पुणे-सोलापूर महामार्गाने त्यांचा टेम्पो निघाल्यानंतर त्यांनी कासुर्डी (ता.दौंड जि.पुणे) येथील रिलायन्स पेट्रोल पंपावर टेम्पोत डिझेल भरले आणि  पंपाजवळ रस्त्याच्या कडेला टेम्पो लॉक करून बाथरूम मध्ये गेले होते. काही वेळाने ते दोघे टेम्पो जवळ आले त्यावेळी त्यांच्या टेम्पो च्या दरवाजाची काच खाली घेतलेली आणि रबर निघालेल्या अवस्थेत दिसून आले. 

यावेळी त्यांनी टेम्पोच्या आत ठेवलेली रक्कम शोधली असता त्यांना कुठेच रक्कम मिळून आली नाही.  त्यावेळी त्यांची खात्री झाली की त्यांनी टेम्पोच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली रक्कम कुणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून घेऊन गेला आहे आणि त्यांनी यवत पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दाखल केली आहे.

यवत पोलिसांनी टेम्पो चालकाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला असून यवतचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस तपास करत आहेत.