Categories: Previos News

Cow’s eye cancer surgery successful – श्री.बोरमलनाथ गोशाळेतील गाईचा कॅन्सर झालेला डोळा काढल्याने गाईला मिळाले जीवदान! श्री.बोरमलनाथ गोशाळेतील 210 गाईंच्या चाऱ्यासाठी दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याची गरज



| सहकारनामा |

दौंड : दौंड तालुक्यातील बोरीपार्धी येथे श्री.बोरमलनाथ मंदिर परिसरात मोठी गोशाळा (Cow’s eye cancer surgery successful) उभारण्यात आली असून या गोशाळेतील गाईंचा सांभाळ येथील मंदिराचे पुजारी कैलासआबा शेलार हे अनेक वर्षांपासून करीत आहेत.

दि. १०/०५/२०२१ दौंड येथील कारवाईत ताब्यात घेतलेल्या गावरान जातीच्या गाईचा डावा डोळा कॅन्सरच्या आजाराने (Cow’s eye cancer surgery successful) त्रस्त होता. पीडित गाईवर  बोरमलनाथ गोशाळेत योग्य ते उपचार करण्यात आले. पण तरीही योग्य उपचार केल्यावर सुद्धा गाईचा डोळा वाचवण्यात अपयश आले. परंतु सदर गाईवर योग्य ती शस्त्रक्रिया करून गाईचा डोळा काढून टाकण्यात आला आणि ती शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. 

केडगाव येथिल पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर पठाण व डॉक्टर राहुल लकडे यांनी गाईवर उपचार करून (Cow’s eye cancer surgery successful) गाईचे प्राण वाचवले. श्री बोरमलनाथ गोशाळा आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मिळून या गाईला कॅन्सरच्या आजारातून मुक्त करून तिला जीवदानच दिले असे म्हणता येईल.

अश्या अनेक गाईंचा सांभाळ श्री बोरमलनाथ गोशाळा करते, तसेच भाकड गाई, वयस्क झालेल्या गाई, बैल, अपंग गाई आणि कत्तलखान्यात जातांना सोडवून आणलेल्या गायींची सेवा व संगोपन ह्या गोशाळेमार्फत केली जाते.

मात्र कोरोना महामारीमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनचा फटका जसा सर्वांना बसत आहे तसाच या उपक्रमालाही बसू लागला आहे.

सध्या गोशाळेत २१० गाई आहेत. दोन टन चाऱ्यासाठी रोज व्यवस्था केली जाते. लॉकडाऊन असल्यामुळे गोशाळा चालवणे अत्यंत कठीण जाते. त्यामुळे समाजातील गो प्रेमी व दानशूर व्यक्तींनी चाऱ्यासाठी सहकार्य करावे अशी विनंती या गोशाळेचे संचालक आणि मंदिराचे पुजारी श्री कैलास आबा शेलार यांनी केली आहे.

दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी खालील बँक अकाउंटवर आपली मदत पाठविण्याचे आवाहन कैलास आबा शेलार आणि ‛सहकारनामा’ वृत्तपत्रातर्फे करण्यात येत आहे.

Bank details

Shri Bormalnath Goshala Trust Pune ( Axis Bank, Branch- Bavdhan Pune )

A/c No. : 921020003334582

IFSC Code : UTIB0001918

Contact No.8380808051

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

23 मि. ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

14 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

15 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

17 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago