Categories: Previos News

covid isolation center in rahu – राहू मध्ये उद्यापासून 50 बेड चे कोविड आयसोलेशन सेंटर सुरू



| सहकारनामा |

दौंड : संदीप सोनवणे

दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या मार्गदर्शनाखाली व ग्रामस्थांच्या लोकसहभागातून तसेच युवकांच्या स्वयंसेवेतून राहू येथे उद्या दि. 6 मे पासून कोविड आयसोलेशन सेंटर सुरु होत आहे.

राहू हे दौंड तालुक्यातील शेती व व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाचे आणि वर्दळीचे ठिकाण असल्यामुळे येथे कोरोनारुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे राहू व आसपासच्या परिसरात कोविडवर मात करण्यासाठी कोरोनाबाधित रुग्णांसाठी ५० बेडचे डेडीकेटेड कोविड आयसोलेशन सेंटर राहूच्या जि. प शाळेमध्ये सुरू करण्यात येणार आहे

संपूर्ण गावाने एकत्र येऊन कोरोनावर मात करण्यासाठी गेल्या काही दिवसांमध्ये वर्गणी स्वरूपात लोकनिधी जमा केल्यामुळे राहू परिसरात विश्वासाचे वातावरण तयार झाले आहे. त्यासाठी खासकरून युवकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला दिसतो आहे. रुग्णांची कोविड चाचणी, औषधोपचार, स्वच्छता, साफसफाई आणि कडक बंदोबस्तासाठी हा लोकनिधी वापरला जाणार आहे. राहू व परिसर रूग्णांकरिता विनामुल्य कोरोनामुक्त करणे हे एकमेव धोरण ठेवून ही व्यवस्था उभारण्यात आलेली आहे.

गावातील युवा सामाजिक कार्यकर्ते व सहकाऱ्यांनी या सेंटरची जबाबदारी घेतलेली असून, राहू ग्रामपंचायत, स्थानिक व जिल्हा प्रशासनाच्या मदतीने इथे सर्व आरोग्यसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

गुरुवारी आमदार राहुल कुल, सरपंच दिलीप देशमुख, पोलिस पाटील सुरेश सोनवणे यांच्या उपस्थितीमध्ये हे केंद्र सुरु करण्यात येणार आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

14 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago