Covid Fighter : दौंड मधील कोरोना योद्ध्यांचा पुण्यात सन्मान, डॉ शलाका लोणकर, सुशील शहा यांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव



दौंड : सहकारनामा

कोरोना काळामध्ये सामाजिक कामात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कोरोना योद्ध्यांना कोटक महिंद्रा इन्शुरन्स कंपनी(पुणे) च्या वतीने सन्मानित करण्यात आले. 



पुणे येथे झालेल्या समारंभामध्ये डॉक्टर्स, उद्योजक ,सामाजिक कार्यकर्ते, शिक्षण, राजकीय आदी क्षेत्रातील मान्यवरांनी कोरोना काळात केलेल्या समाज कार्याबद्दल त्यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. दौंड मधील महालक्ष्मी हॉस्पिटलच्या संचालिका डॉ.शलाका लोणकर व रत्नात्रय ज्वेलर्स चे सुनील शहा यांना ही कोविड योद्धा म्हणून गौरविण्यात आले आहे.



कंपनीचे सह महाव्यवस्थापक सत्येंद्र सिंग यांच्या हस्ते सर्व कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी कोटक महिंद्रा चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.