covid center cancel – केडगाव येथील मोहन हॉस्पिटल कोविड सेंटरवर चौकशी समितीचे ‛22’ गंभीर आरोप, रुग्णांसह इंशोरन्स कंपनीलाही गंडा घातल्याचा समितीचा ठपका, अखेर कोविड सेंटरची ‛मान्यता ‛रद्द’! जाणून घ्या ते 22 मुद्दे



| सहकारनामा |

दौंड : 

दौंड तालुक्यातील केडगाव येथे असणारे  मोहन हॉस्पिटलच्या कोविड केअर सेंटरची मान्यता अखेर रद्द करण्यात आली आहे.

याबाबत चौकशी समितीने आपला 3 पाणी अहवाल सादर केला असून यात जवळपास 22 मुद्द्यांचा समावेश आहे. या 22 मुद्द्यांमध्ये या कोविड केअर सेंटरने केलेल्या हलगर्जीपणाचा आणि बिलामध्ये रुग्णांना लुटल्याचा तसेच इन्शुरन्स कंपनीला गंडा घातल्याचा ठपकाही ठेवण्यात आला आहे.

अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार केडगाव ता.दौंड जि.पुणे या रूग्णालयास DCHC

(डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर) सुरू करणेची मान्यता देणेत आलेली होती. त्यानुसार त्या ठिकाणी DCHC

सेंटर सुरू करणेत आलेले होते.

ज्या अर्थी दौंड तालुक्यात दि. २८.०४.२०२१ रोजी मोहन हॉस्पिटल केडगांव ता. दौंड येथे एकाच दिवशी ४ रूग्णांचा मृत्यु झालेने सदर हॉस्पिटलची तपासणी करणेकामी समिती नियुक्त करणेत आलेली होती. सदर

समितीने हॉस्पिटलची तपासणी करून Assistant incident Commander तथा तहसिलदार दौंड यांचे मार्फत अहवाल सादर केला आहे. 

या अहवालात खालील नमूद केले प्रमाणे वस्तुस्थिती दिसून आली आहे.

“१) आंतररूग्ण केसपेपर वर रूग्णांचे निदान नोंद नाही.

२) रूग्णांचे नातेवाईकांचे संमती व स्वाक्षरी घेतलेली दिसुन येत नाही.

३) केसपेपर वर संमती पत्रावर कोणी संमती दिली याचा उल्लेख केलेला नाही.

४) रूग्ण दाखल करताना वेळेची नोंद घेणेत आली नाही.

५) रूग्णांच्या दैनंदिन नोंदी स्पष्टपणे घेणेत आलेल्या नाहीत.

६) औषध पत्रावर नोंद केलेल्या औषधांचे आदेश हे आंतररूग्ण उपचार पेपर वर दिसुन येत नाही.

७) रूग्णांचे Vital Parameters अर्धवट नोंदविलेले आहेत.

८) मृत्यु प्रमाणपत्र विहीत नमुण्यात सादर केलेले नाहीत.

९) दि. २९.०४.२०२१ रोजी पाहणी केली असता अतिदक्षता विभागात एकुण १८ रूग्ण भरती होते.

अतिदक्षता विभागाची जागा पाहता मर्यादापेक्षा जास्त बेड ठेवण्यात आलेले आहेत.

१०) अतिदक्षता विभागात २ बेड मध्ये केवळ २ फुटाचे अंतर होते. जे अयोग्य आहे.

११) जैव वैद्यकीय घनकचरा विल्हेवाट अयोग्य व अशास्त्रीय पदधतीने लावण्यात येत आहे.

१२) प्रति ३ खाटांसाठी १ असुन सदरची अट हॉस्पिटलकडुन पुर्ण झालेचे दिसुन येत नाही.

१३) सेवा त्यांचे आकारण्यात येणारे सर्व प्रकारचे दर विस्तुतपणे दर्शविणारे दरपत्रक अथवा अनुसुची (३)

मध्ये नमुद केलेल्या विशिष्ट दराची यादी दर्शनी भागात दिसुन आली नाही. तसेच कोविड-१९ च्या

अनुषंगाने दरपत्रक लावलेले दिसुन येत नाही.

१४) ऑक्सिजन ऑडीट प्रमाणपत्र सादर करण्यात आलेले नाही.

१५) रॅपिड अॅन्टीजेन टेस्ट करीत असल्याचे दिसुन येत आहे. परंतु सदर टेस्ट नोंदणी रजिस्टर ICMR

च्या मार्गदर्शक सुचनेनुसार ठेवण्यात आलेले नाही. तसेच रूग्णांचा ICMR ID कोठेही जनरेट

झालेला दिसुन येत नाही.

१६) बिलांबाबत तक्रारी प्राप्त होत असलेने रूग्णांस दिलेले बिले प्राप्त करून घेणेकामी लेखापरीक्षण

पथकातील श्री बी एच येडे, महसुल अव्वल कारकुन,तहसिल दौंड व श्री डी एस लोणकर, कु.का.अ.कारकुन,

तहसिल दौड हे बिले प्राप्त करून घेणेसाठी सदर हॉस्पिटल येथे गेले असता त्यांना ३-३ तास तसेच बसुन ठेवुन उदया

देतो यानुसार २-३ दिवस बिले दिलेले नाही.

त्यामुळे त्यांना या कार्यालयाकडील वरील संदभीय नोटीस क्र. ३ अन्वये खुलासा सादर करणेबाबत कळविले होते परंतु त्यांनी खुलासा सादर केलेला नाही. तसेच नंतरही सर्व बिले सादर न

केलेबाबत या कार्यालयाकडील वरील संदर्भीय नोटीस क्र. ४ अन्वये खुलासा सादर करणेकामी कळविले होते परंतु त्यांनी कोणताही खुलासा सादर केलेला नाही. यावरून त्यांनी लेखापरीक्षण पथकास कोणत्याही प्रकारे सहकार्य केलेले दिसुन येत नाही.

तसेच वैद्यकीय अधिक्षक, उपजिल्हा रूग्णालय दौंड व वैद्यकीय अधिक्षक, ग्रामीण रूग्णालय यवत यांचे अहवालानुसार सर्व बाबींचा विचार केला असता व डॉ धिरेंद्र मोहन, मोहन हॉस्पिटल, केडगांव ता. दौंड जि.पुणे यांचा हॉस्पिटल करीता ऑक्सिजन पुरवठा या विषयी त्यांनी केलेल्या स्वयंस्पष्ट अभिप्राय नुसार वरील मृत्यु हे ऑक्सिजन

अभावी मुळे झालेले नाहीत. परंतु मोहन हॉस्पिटल केडगांव हे कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखणेविषयीचे कामकाज करत असताना हॉस्पिटल मध्ये नियमानुसार ज्या बाबींची पुर्तता करणे आवश्यक होते त्याबाबींची पुर्तता करत नसलेचे दिसुन येत आहे. सध्या कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखणेविषयक महत्वाचे कामकाज चालु असताना तसेच प्रशासनास वारंवार नोटीस काढुनही कुठल्याही प्रकारे सहकार्य करत नसलेचे दिसुन येत आहे.

“१) मोहन हॉस्पिटल केडगांव यांनी जैव वैद्यकीय कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावत नसलेबाबत महाराष्ट्र राज्य

प्रदुषण नियंत्रण मंडळ यांचेकडुन तपासणी करून पुढील कारवाई करणे आवश्यक आहे.

२) रॅपिड अॅन्टीजेन टेस्ट करीत असल्याचे दिसुन येत आहे. परंतु सदर टेस्ट नोंदणी रजिस्टर ICMR च्या मार्गदर्शक

सुचनेनुसार ठेवण्यात आलेले नाही. तसेच रूग्णांचा ICMR ID कोठेही जनरेट झालेला दिसुन येत नाही.

यावरुन कोरोना विषयक कामकाज नियमानुसार करत नसलेमुळे त्यांची आपणाकडुन देण्यात आलेली DCHC

बाबत दिलेली परवानगी रदद करण्यात यावी.

३) दि बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन अॅक्ट १९४९ अन्वये व महाराष्ट्र नर्सिंग शुश्रूषागृह नोंदणी नियम २०२१ च्या

अनुषंगाने हॉस्पिटल कडुन आवश्यक परिचारीकांची पुर्तता नाही, दर दर्शनी भागात लावलेले नाहीत, ICU बेड

मधील अंतर कमी आहे.ऑक्सिजन ऑडीट प्रमाणपत्र नाही. या बाबी दिसुन येत असलेने सदर हॉस्पिटल ची

परवानगी रदद करून सदर हॉस्पिटल सिल करणेबाबत मा. जिल्हा शल्यचिकीत्सक, पुणे यांना वैदयकिय

अधिक्षक वर्ग १, उपजिल्हा रूग्णालय दौंड व वैदयकिय अधिक्षक , ग्रामीण रूग्णालय यवत ता.दौंड यांनी अहवाल

सादर केलेला आहे.

४) कोरोना बाबत उपचार केलेल्या रूग्णांकडुन जे अतिरीक्त रक्कम बिलात सामाविष्ठ करण्यात आलेली आहे

त्याची संबंधित रूग्णांना सदर अतिरीक्त रक्कम हॉस्पिटल कडुन वसुल करून रूग्णाना परत करणेबाबत आदेश

होणे आवश्यक आहे.

५) श्री योगेश विलास गायकवाड यांचे बिलाची रक्कम ८७०००/- एव्हढी आहे. परंतु त्यांनी इन्श्युरन्स

कंपनीकडुन रक्कम रू २,७७,९०३/- वसुल केलेली आहे. व रूग्णांकडनु डिपॉझिट म्हणुन घेतलेले रक्कम रू

६००००/- रूग्णांनी मागणी केली असता रूग्णालयाने सदर रक्कम परत दिलेली नाही. तरी सदर रूग्णास डिपॉझिट रक्कम मिळणेबाबत आदेश होणे आवश्यक आहे व सदर रूग्णालयाने इन्शुरन्स कंपनीकडुन जास्त रक्कम

वसुल केलेमुळे सदर कंपनीकडुन त्याची वसुली होऊन होणे आवश्यक आहे.”

६) तपासणी पथकाने केलेल्या तपासणीमध्ये मोहन हॉस्पिटल केडगाव ता.दौंड या ठिकाणी उपचार घेतलेल्या

रूग्णांच्या बिलांची दिनांक ०१/०४/२०२१ ते ०१/०५/२०२१ या कालावधीतील ५९ बिलाची तपासणी केली

असता त्यामध्ये १२,५६,८१०/- अतिरीक्त घेतलेचे दिसून येत आहे.

ज्या अर्थी मोहन हॉस्पिटल यांनी DCHC (डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेटर) सुरू केले नंतर उक्त नमुदकलले कृत्य हे रूग्णांचे दृष्टीने बेजाबदारपणाचे असलेचे सिध्द होत आहे.  

त्याअर्थी वाचले क्रमांक ९ चे अवलोकन करता मोहन हॉस्पिटल केडगांव ता. दौंड यांना या कार्यालयाकडून देणेत आलेली DCHC (इंडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेटर) ची मान्यता रद्द करणे आवश्यक असलेने सदर मोहन जनरल हॉस्पिटल कोविड सेंटरची मान्यता रद्द करण्यात येत असल्याचे प्रांताधिकारी यांनी आदेश दिले आहेत.

याबाबत डॉ.मोहन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून कोणतेही उत्तर मिळाले नाही.