Covid Center – राहू येथे कोविड आयसोलेशन सेंटर सुरू, आ.राहुल कुल यांच्याहस्ते उद्घाटन



| सहकारनामा |

दौंड : संदीप सोनवणे

आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीमध्ये राहु येथील कोविड आयसोलेशन सेंटरची सुरुवात गुरुवारी सकाळी करण्यात आली.

यावेळी राहू गावचे सरपंच दिलीप देशमुख , भीमा पाटसचे संचालक आबासाहेब खळदकर, यवत गावचे उपसरपंच सुभाषबाप्पू यादव, राहू गावचे पोलीस पाटील सुरेशतात्या सोनवणे, गणेश चव्हाण आणि युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

राहू हे दौंड तालुक्यातील शेती व व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाचे आणि वर्दळीचे ठिकाण असल्यामुळे येथे कोरोनारुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे राहू व आसपासच्या परिसरात कोविडवर मात करण्यासाठी कोरोनाबाधित रुग्णांसाठी ५० बेडचे डेडीकेटेड कोविड आयसोलेशन सेंटर उभारण्यात आले.

संपूर्ण गावाने एकत्र येऊन कोरोनावर मात करण्यासाठी गेल्या काही दिवसांमध्ये वर्गणी स्वरूपात लोकनिधी जमा केल्यामुळे राहू परिसरात विश्वासाचे वातावरण तयार झाले आहे. त्यासाठी खासकरून युवकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला दिसतो आहे. रुग्णांची कोविड चाचणी, औषधोपचार, स्वच्छता, साफसफाई आणि कडक बंदोबस्तासाठी हा लोकनिधी वापरला जाणार आहे. 

राहू व परिसर रूग्णांकरिता विनामुल्य कोरोनामुक्त करणे हे एकमेव धोरण ठेवून ही व्यवस्था उभारण्यात आलेली आहे..

गावातील युवा सामाजिक कार्यकर्ते व सहकाऱ्यांनी या सेंटरची जबाबदारी घेतलेली असून, राहू ग्रामपंचायत, स्थानिक व जिल्हा प्रशासनाच्या मदतीने इथे सर्व आरोग्यसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.