Covid Care Center – केडगावमध्ये कोविड केअर सेंटरचे आ.राहुल कुल यांच्याहस्ते उदघाटन, या दानशूर व्यक्तींकडून कोविड सेंटरला भरघोस मदत



| सहकारनामा |

दौंड : दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या हस्ते आज केडगाव कोविड सेंटरचे उदघाटन करण्यात आले. हे कोविड सेंटर होण्यासाठी आमदार राहुल कुल यांनी विशेष प्रयत्न केले होते.

दौंड तालुक्यातील केडगाव येथे जवाहरलाल विद्यालय केडगाव येथे हे 100 खाटांचे कोविड सेंटर उभारण्यात आले असून यासाठी आमदार राहुल कुल यांनी विशेष प्रयत्न केले तर आ.कुल यांच्याकडे भीमा पाटसचे मा.उपाध्यक्ष आनंद थोरात यांनी हे कोविड सेंटर लवकरात लवकर सुरू व्हावे यासाठी पाठपुरावा केला होता.

कोविड सेंटरच्या उद्घाटननानंतर आमदार राहुल कुल यांनी बोलताना या कोविड सेंटरला हवी ती मदत करू तसेच येथे काहीही कमी पडू देणार नाही असे जाहीर केले.

या कोविड सेंटरला लिबेर कंपनीतर्फे 100 लोखंडी बेड (खाट) , काकासाहेब थोरात पतसंस्था तर्फे 100 गाद्या, देशभक्त केशवराव जेधे फाउंडेशन अध्यक्ष दिग्विजय जेधे यांच्यातर्फे दररोज कोविड रुग्णांसाठी जेवणाचे नियोजन, जैन श्रावक संघातर्फे 9 सिलिंग फॅन, 100 बेडशीट, 50 उषा, टेम्प्रेचर गन, ऑक्सिमिटर, प्रीतम गांधी यांच्यातर्फे 10 स्टूल, प्रसाद जनरल स्टोरतर्फे 2 सिलिंग फॅन, धनलक्ष्मी 5 सिलिंग फॅन, दौंड पत्रकार संघ 100 उषा, सोमजाई वि.का.तर्फे 5 सिलिंग फॅन, किशोर सेठ सुंदराणी आणि कंपनी तर्फे 5 सिलिंग फॅन, सुहाना कंपनी 50 बेडशीट,  शेरूशेठ सुंदराणी 20 वाफेचे मशीन, आबासाहेब चोरमले यांच्यातर्फे 4 सॅनिटायजर कॅन, बाळासो पितळे 20 बादली, यात कोविड रुग्णांसाठी सर्व खोल्या आणि विशेष सहकार्य नेताजी शिक्षण संस्था केडगाव स्टेशन यांनी केले आहे.

या कार्यक्रमाला दौंडचे आमदार राहुलदादा कुल, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.पोळ मॅडम, केडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधीक्षक डॉ.होनमाणे, केडगाव कोविड सेंटरच्या इनचार्ज डॉ.देवकाते मॅडम, केडगाव पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंपले, धनजीभाऊ शेळके, अप्पासो हंडाळ, किरण देशमुख, सरपंच अजित शेलार पाटील, उपसरपंच अशोकराव हंडाळ, बोरीपार्धी सरपंच सुनील सोडनवर, युवराज रुपनवर, ग्रामसेवक डोळस, झाडगे यांसह परिसरातील विविध मान्यवर व युवाकार्यकर्ते उपस्थित होते.