| सहकारनामा | अब्बास शेख |
दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव येथे कोविड केअर सेंटर (Covid Care Center) सुरू होण्यासाठी दौंडचे आमदार राहुल कुल यांच्याकडे भीमा पाटस चे माजी उपाध्यक्ष आनंददादा थोरात, धनजीभाऊ शेळके यांसह चार ते पाच गावांतील सरपंच, उप सरपंचांनी मागणी केली होती.
या कामामध्ये आमदार राहुल कुल यांनी त्वरित लक्ष घालून तत्परतेने केडगाव येथील जवाहरलाल विद्यालय येथे कोविड केअर सेंटर सुरू होण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत येथे कोविड केअर सेंटर (Covid Care Center) होण्याच्या दृष्टीने सर्व टेक्निकल डॉक्युमेंट सबमिट केले होते.
हे केअर सेंटर सुरू होणार असल्याने अनेकांनी येथे खाट, गादी, उशी असे साहित्य देऊन आपले सामाजिक कर्तव्य पार पाडले मात्र शनिवारी आनंद थोरात यांनी आमदार राहुल कुल यांची भेट घेत यातील एक टेक्निकल अडचण समोर मांडली आणि हे केअर सेंटर सुरू होण्यासाठी विलंब होत असल्याने आपली नाराजी व्यक्त केली.
आमदार कुल यांनी लागलीच वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावून चांगलेच फैलावर घेतले आणि आणि आम्ही सर्वजण घरात बसतो तुम्ही सर्व व्यवस्था करा, आणि आम्ही फक्त टिकाकाराची भूमिका बजावतो असे सांगत चांगलाच संताप व्यक्त केला यावेळी तेथे उपस्थित असणाऱ्या आनंद थोरात, बोरीचे सरपंच सुनील सोडनवर, केडगाव चे सरपंच अजित शेलार पाटील, ग्राप सदस्य नितीन जगताप, सामाजिक कार्यकर्ते धनराज मासाळ यांनी आ.कुल यांचा रुद्रावतार पाहून अवाक झाले.
आमदार कुल यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रशासनाच्या प्रशाकीय चुका थेट त्यांच्या समोर दाखवून देत नागरिकांची गरज काय ओळखून येथे नेमकी कशाची गरज आहे आणि यात दिली जाणारी मान्यता यात किती मोठा फरक आहे हे निदर्शनास आणून दिले. यावेळी कुल यांनी प्रशासनाला धारेवर धरताच केडगाव आणि परिसरासाठी अत्यंत गरजेचे असणाऱ्या कोविड केअर सेंटरची मान्यता मिळाल्याने काही दिवसांत आता येथे कोविड केअर सेंटर सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.