Categories: Previos News

Covid Care Center – दौंड मधील वाहेगुरू सेवा संस्थेच्या वतीने शहरामध्ये कोविड सेंटर सुरू, जास्तीत जास्त रुग्णांना कोरोना मुक्त करण्याचा संस्थेचा निर्धार



| सहकारनामा |

दौंड : (अख्तर काझी)

शहरातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर, येथील प्रशासनाला मदतीच्या उद्देशाने तसेच गुरु तेग बहादुर साहेब यांच्या 400 व्या अवतरण दिनाच्या निमित्ताने येथील वाहेगुरू सेवा संस्थेच्या वतीने शहरातील सिंधी मंगल कार्यालयामध्ये कोविड केअर सेंटर (Covid Care Center) सुरू करण्यात  आले. सामाजिक कार्यकर्त्यांनी सुरू केलेले शहरातील हे तिसरे कोविड सेंटर आहे. 

उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ. सिद्धार्थ कुलकर्णी, शलाका लोणकर, समीर कुलकर्णी, क्षितिजा कुलकर्णी, विक्रम नारंग, राजेश दाते, सुनिता कटारिया, दीपक जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. संग्राम डांगे म्हणाले की, सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांनी घरी बसून न राहता अशा कोविड सेंटर मध्ये दाखल व्हावे जेणे करून संसर्गाची साखळी तूटण्यास मदत होईल. 

या ठिकाणी दाखल रुग्ण डॉक्टर्सच्या निगराणी खाली असणार आहेत तसेच त्यांना पौष्टिक आहार,करमणूक व त्यांचे मनोधैर्या वाढविण्यासाठी येथे समुपदेशन होणार आहे त्याचा रुग्णांना निश्चितच मोठा फायदा होऊन ते बरे होऊन घरी परततील.  सर्वांच्या सहकार्याने सर्व रुग्णांना लवकरात लवकर बरे करून दौंड शहर कोरोना मुक्त करण्याचा आमचा निर्धार आहे असे वाहेगुरू सेवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

8 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

21 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

23 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago