सुखःद बातमी : राज्य सरकारकडून कोविड निर्बंध शिथिल! ‘अ’ आणि ‘ब’ कॅटेगिरी तयार करून ‘अ ’ कॅटेगिरीतील ‘हे’ 14 जिल्हे 100% खुले होणार, जाणून घ्या तुमचा जिल्हा कोणत्या कॅटेगिरीत आहे

मुंबई : कोविड च्या अनुषंगाने राज्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांत ४ मार्चपासून शिथिलता आणण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. कोविड सद्यस्थिती, जोखीम, लसीकरण स्थिती, पॉझिटिव्हिटी दर आणि रुग्णांनी व्यापलेली बेडची संख्या यानुसार प्रशासकीय घटक ‘अ’ आणि ‘ब’ असे वर्गीकरण करण्यात आले आहे.

प्रशासकीय घटक ‘अ’ मधील शॉपिंग कॉम्प्लेक्स, चित्रपटगृह, उपहारगृह, बार, क्रीडा संकुल, व्यायामशाळा, स्पा, जलतरण तलाव, धार्मिक स्थळ, नाट्यगृह, पर्यटन स्थळ, मनोरंजन पार्क आदींना १०० टक्के क्षमतेने संचलन करण्यास परवानगी असेल. तर ‘ब’ घटकामध्ये क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीची मर्यादा असणार आहे.

प्रशासकीय घटक ‘अ’ यादीमध्ये १४ जिल्ह्यांचा समावेश असून त्यात मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर, रायगड, वर्धा, रत्नागिरी, सातारा, सांगली, गोंदिया, चंद्रपूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

8 मि. ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

20 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago