Covid 19 – कोरोना रुग्णांची योग्य काळजी घ्या! आ.राहुल कुल यांचे अधिकाऱ्यांना निर्देश



दौंड : सहकारनामा

सध्या दौंड तालुक्यामध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. या सर्व घडामोडींची माहिती घेण्यासाठी आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी दौंड चे आमदार राहुल कुल यांनी आज दि.26 मार्च रोजी सर्व शासकीय अधिकारी आणि डॉक्टरांची यवत येथील शासकीय विश्राम गृहात बैठक बोलावून डॉक्टर आणि अधिकाऱ्यांसोबत कोविड 19 बाबत चर्चा करून योग्य त्या सूचना दिल्या आहेत.


सद्य स्थितीमध्ये दौंड शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात ४०० हुन अधिक कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत, दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येमध्ये होणारी हि वाढ अत्यंत चिंतेची बाब आहे. 

वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपायोजना तसेच तयारीचा आढावा घेण्यासाठी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी तालुक्यातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची आज शासकीय विश्रामगृह यवत येथे बैठक घेतली. यावेळी सार्वजनिक रुग्णालयांमध्ये कोविड टेस्ट किट, PPE किट, मास्क ची योग्य प्रमाणात उपलब्धता सुनिश्चित करावी, आवश्यकतेनुसार टेस्ट ची संख्या वाढवावी, शासकीय रुग्णालय, डेडिकेटेड कोविड सेंटर, खाजगी रुग्णालये  येथे ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर आदी ची उपलब्धता सुनिश्चित करावी आणि रुग्णांची योग्य ती खबरदारी घ्यावी असे निर्देश त्यांनी दिले. 

या बैठकीस श्री. संजय पाटील (तहसीलदार),  श्री. गणेश मोरे (गटविकास अधिकारी),  श्री. डॉ. संग्राम डांगे (अधीक्षक, दौंड उपजिल्हा रुग्णालय), डॉ. सुरेखा पोळ (तालुका वैद्यकीय अधिकारी), डॉ. शशिकांत इरवाडकर (अधीक्षक, यवत ग्रामीण रुग्णालय), श्री. भाऊसाहेब पाटील ( पोलीस निरीक्षक, यवत), श्री. नारायण पवार (पोलीस निरीक्षक, दौंड), गटविकास अधिकारी अजिंक्य येळे आदी उपस्थित होते.