Categories: पुणे

कौटूंबिक समस्यांबाबत महिलांसाठी केडगावमध्ये समुपदेशन केंद्र, खा. सुप्रिया सुळे यांच्या उपक्रमाला प्रतिसाद

दौंड : केडगाव ता.दौंड येथे महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच महिलांसाठी आर्थिक साक्षरता व विधी साक्षरतेसाठी समुपदेशन व मार्गदर्शन केंद्र सुरु करण्यात आले आहे. हा उपक्रम चव्हाण सेंटरच्या माध्यमातून राबविण्यात येतो. याचाच एक भाग म्हणून आता “कौटुंबिक समस्या : समुपदेशन, कायदेशीर सल्ला आणि मार्गदर्शन’ हा आणखी एक उपक्रम सुरू करण्यात आला असल्याची माहिती चव्हाण सेंटरच्या कार्याध्यकक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी ही दिली आहे.

विधी आक्षरता या अभियानाला राज्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातूनही खूप चांगला प्रतिसाद मिळत असून बऱ्याच महिलांना स्वतःशी संबंधीत कायद्याच्या आणि अधिकाराच्या बऱ्याच गोष्टी माहीत नसल्याचे आपल्याला या कार्यक्रमांतून जाणवल्याचे सुळे यांनी म्हटले आहे. राज्यातील बहुतांश महिलांना किंवा कुटुंबांना कौटुंबिक समस्या निवारणासाठी कायदेशीर प्रक्रिया असते याची खूपच कमी माहिती असते. परिणामी त्यांच्या मनात एक प्रकारची भीती असते. त्यामुळेच ती कुटुंबे अथवा त्या महिला कायदेशीर प्रयक्रियेचा अवलंब करत नाहीत. अशा सर्व महिलांना आणि कुटुंबांना योग्य तो कायदेशीर सल्ला देत न्याय प्रक्रियेमध्ये आणणे किंवा आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी कायद्याचा आधार घ्यावा, यासाठी त्यांना मार्गदर्शनाची गरज असते.

त्यासाठीच यशवंतराव चव्हाण सेंटर तर्फे ‘कौटुंबिक समस्या : समुपदेशन, कायदेशीर सल्ला आणि मार्गदर्शन केंद्रा’ची सुरवात करण्यात आली आहे. पुण्यासह जिल्ह्यातील सर्व १३ तालुके आणि मुंबई, ठाणे, औरंगाबाद, बीड, सिंधुदुर्ग, परभणी, नाशिक, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यांमध्येही ही मार्गदर्शन केंद्रे सुरू करण्यात येत आहेत.
खा.सुप्रिया सुळे यांच्या ह्या उपक्रमाला साथ देणासाठी दौंड तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षा सौ.योगिनी दिवेकर यांनी पुढाकार घेऊन आपल्या ऑफिसमध्येच या समुपदेशन केद्रांसाठी जागा उपलब्ध करून दिली आहे.

या समुपदेशन केंद्राचे उद्घाटन राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आप्पासो पवार, राष्ट्रवादी जिल्हा विभाग प्रमुख वैशालीताई नागवडे, महिला पोलिस सूर्यवंशी, भोंगळे यांच्या हस्ते पार पडले तर समुपदेशक म्हणून कामकरणाऱ्या सौ.रागिनी ताकवणे आणि योगिनी दिवेकर यांनी सेंटरची संकल्पना तसेच खा.सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यामागील उद्देश व कौटुंबिक कलह वाढू नये यासाठी करण्यात येणारे उपदेश याबाबतची माहिती दिली. कायदेशीर मार्गदर्शन अँड.उदय फरतडे, अँड.संदीप शेलार यांनी केले.

या कार्यकमाला वैशालीताई नागवडे, आप्पासो पवार, मीनाताई दिवेकर ए .सी . कॉलेजचे प्राचार्य शितोळे सर, फार्मसी कॉलेजच्या प्राचार्य डोंगरे मॅडम, रामभाऊ टूले दिलिप हंडाळ, महिला पोलिस सूर्यवंशी मॅडम, भोगंळे, ज्योती शेळके मॅडम व बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.

Team Sahkarnama

Recent Posts

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

4 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

24 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago