दौंड : सहकारनामा ऑनलाइन
संपूर्ण जगाला वेठीस धरू पाहणाऱ्या कोरोना व्हायरस पासून बचाव करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये विविध सामाजिक संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते हिरीरीने भाग घेत असल्याचे आपण बातम्यांममधून पाहत आहोत मात्र आता रस्त्यावर उतरून सामाजिक बांधिलकी जपण्यामध्ये राजकीय व्यक्तीही मागे राहिले नसल्याचे दौंडमधील एका घटनेवरून पुढे येत आहे.
दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली या गावच्या माजी सरपंचाने स्वतः हातामध्ये स्प्रे पंप घेऊन वाडी वस्तीमध्ये औषध फवारणी करण्यास सुरुवात केली असून त्यांनी नागरिकांना 700 डेटॉल आणि लाईफबॉय साबण मोफत देत त्यांना सुरक्षिततेचे धडेही दिले आहेत. अझरुद्दीन शेख असे या माजी सरपंचाचे नाव असून त्यांनी कोरोना विषयी जनजागृती करण्यासाठी गावासह वाड्यावस्त्यावर डेटोल साबणाचे वाटप करत स्वतःच्या पाठीवर पंप घेउन घरोघरी जाउन नागरिकांच्या अंगावर डेटॉल फवारणी करत आहेत.