नवी दिल्ली :(वृत्तसेवा) सहकारनामा ऑनलाईन
– कोरोना व्हायराचा सामना संपूर्ण जग करत आहे मात्र यामध्ये सर्वात मोठे योगदान हे आरोग्य कर्मचाऱ्यांचे आहे. आरोग्य कर्मचारी आपल्या परीने देश सेवेत गुंतले आहेत मात्र या आरोग्य कर्मचाऱ्यांनाही कधी कधी नागरिकांच्या, रुग्णांच्या नातेवाईकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे त्यातून त्यांच्यावर जीवघेणे हल्लेही होत आहेत ही सर्व बाब लक्षात घेता आता केंद्र सरकारने आज मोठा निर्णय घेत अध्यादेश काढला असून आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला करणं आता अजामीनपात्र गुन्हा ठरणार आहे व हल्ला करणाऱ्यांवर सहा महिने ते सात वर्षे जेल अशी शिक्षा ठेवण्यात आली आहे. याबाबत ANI या वृत्तसंस्थेनेही अधिकृत वृत्त दिले आहे.
जे आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन जनतेची तपासणी करतात त्यांना मोठ्या प्रमाणावर त्रा दिला जातो तसेच काही डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले होत असल्याचे प्रकार समोर आले होते. त्यामुळे आता आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला करणं अजामीनपात्र गुन्हा ठरणार असून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज बुधवारी याबाबत माहिती दिली. जावडेकर यांनी पुढे बोलताना या कोरोनाच्या लढाईत देशाला वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना दुर्दैवाने लोकांच्या हल्ल्यांचा सामना करावा लागत आहे. पण त्यांच्यावरील हल्ला आम्ही खपवून घेणार नाही. डॉक्टरांविरोधात हिंसाचार किंवा अशी कोणतीही घटना घडल्यास संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे सांगत यासाठी एक अध्यादेश काढण्यात आला असून तो राष्ट्रपतींच्या मान्यतेनंतर लागू केला जाणार असल्याचंही जावडेकरांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता वैद्यकीय पथकावर हल्ला केल्यास ३ महिन्यांपासून ५ वर्षांपर्यंतची शिक्षा होणार असून ५० हजार ते २ लाख रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो तसेच मोठ्या प्रमाणावर नुकसान क करण्यात आले तर ६ महिन्यांपासून ७ वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद केली गेली आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे.