coronavirus : VIDEO- कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पोलिसाचा गायनातून संदेश, मोठ्या प्रमाणावर व्हिडीओ होत आहे व्हायरल



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

– कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिसांकडून विविध उपाय केले जात आहेत. अनेकवेळा सरकारने दिलेल्या आदेशाचे पालन न केल्यास पोलिसांकडून दंडुक्‍याचाही वापर केला जातो. मात्र, काही पोलीस कर्मचारी आपल्याला लाभलेल्या नैसर्गिग देणगीनेही कोरोनाला रोखण्यासाठी भावनिक साद घालत असल्याचेही दिसून येत आहे. गायनातून कोरोना विषयी जनजागृती करण्याचा असाच एक प्रयत्न पुणे ग्रामीण(यवत) चे पोलीस नाईक मल्हारी (दादा) सोडनवर यांनी केला असून त्यांनी आपल्या गायन कौशल्यातून जर तुम्हाला जगायचे असेल तर काही दिवस तरी घरातच बसावे लागेल असे सूचित केले आहे. दादा सोडनवर हे भजनरत्न म्हणूनही या परिसरात प्रसिद्ध असून त्यांच्या या जनजागृती गाण्याला चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे.

या लिंकवर क्लिक करा आणि पहा पोलिसाच्या गायनाचा व्हिडीओ👇👇

रोना विषयी गायनातून पुणे ग्रामीण पोलिसांची जनजागृती