|सहकारनामा|
मुंबई : कोरोना (corona) ची दुसरी लाट अजून शमत नाही तोच देशात कोरोनाची तिसरी लाट (Corona 3rd wave) येण्याचा इशारा नीती आयोगाने केंद्र सरकारला दिला आहे.
हि तिसरी लाट साधारण एक दोन महिन्यात येऊ शकते असं नीती आयोगाचं म्हटलं आहे. कोरोनाच्या 3 ऱ्या लाटेत देशात साधारण डेली 4 ते 5 लाख रुग्ण सापडण्याची शक्यता ल नीती आयोगाने जाहीर केली आहे. या लाटेचा सामना करण्यासाठी पुढील महिन्यापासून 2 लाख ICU आयसीयू बेड्सची गरज भासू शकते अस नीती आयोगानं स्पष्ट केलं आहे.
येणाऱ्या तिसऱ्या लाटे बाबत सतर्क होण्यासाठी नीती आयोगाने प्रशासकीय यंत्रणेला अलर्ट करत याबाबत काही महत्त्वाच्या सूचना, शिफारशी केल्या आहेत.
संपूर्ण देशात पुढील महिन्यापासूनच कोरोनाचे रौद्ररूप पाहायला मिळू शकते असा अंदाज नीती आयोगानं व्यक्त केला आहे. नीती आयोगानं देशात येणाऱ्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत माहिती देताना देशात सप्टेंबर महिन्यामध्ये दररोज 4 ते 5 लाख कोरोनाबाधित रिगणांची नोंद होऊ शकते असा गंभीर इशारा देतानाच सरासरी 100 बाधित रुग्णांपैकी साधारण 23 कोरोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावं लागू शकतं त्यामुळे सरकारने याची अगोदरच तयारी करून 2 लाख आयसीयू बेड्स तयार ठेवण्याच्या सूचना नीती आयोगानं केंद्र सरकारला केल्या आहेत.