Categories: Previos News

Coronavirus – लोकांनो आता तरी सावध व्हा आणि घरीच बसा! कोरोनाच्या बळींना स्मशानभूमीहि अपुरी पडू लागली, एकाचवेळी जळत आहेत 3-3 चिता




| सहकारनामा | – 

दौंड : सध्या दौंड तालुक्यामध्ये भयावह पाहायला मिळत असून कोरोना व्हायरसच्या परिस्थितीचे गांभीर्य आणि भीषणता लक्षात घ्यायची असेल तर दौंड शहर आणि केडगाव या दोन मोठ्या बाजार पेठ असणाऱ्या गावांमध्ये कोरोनामुळे होत असलेले मृत्यू आणि त्या मृतदेहांवर अंतिमसंस्कार करण्यासाठी कमी पडत असलेली स्मशानभूमी हे आवर्जून पाहावे लागेल म्हणजे वास्तववादी परिस्थितीचे भान येईल. 

गेल्या दीड महिन्यात पुणे जिल्हा आणि दौंड तालुक्यात कोरोना बाधितांचा आकडा आणि त्यातून झालेले मृत्यूचे आकडे हे मनात भीती निर्माण करणारे नक्कीच आहेत. अलीकडेच दौंड तालुक्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत चालल्याने स्मशानभूमीतही आता वेटिंग सुरू होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत.

काल केडगावमध्ये कोरोनामुळे 4 जनांचा मृत्यू झाला. त्यामध्ये तिघांवर केडगाव स्टेशन येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. एकाचवेळी 3 चिता जळत असल्याने त्या चिता पाहणाऱ्यांच्या काळजाचा थरकाप उडत होता. अशी भयानक परिस्थिती केडगावकरांनी कधी अनुभवली नव्हती. 

दौंड शहर आणि तालुक्यात सध्या कोरोना रूग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने नवीन कोरोना बाधित रुग्णांना शहर आणि ग्रामिण भागातील एकाही शासकीय आणि खासगी रुग्णालयात बेड मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

15 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago