वॉशिंग्टन- जगाला भेडसावणाऱ्या कोरोना व्हायरस coronavirus ने अमेरिकेत हाहाकार माजवला आहे. गेल्या दोन दिवसात अमेरिकेला चिंतेत टाकणारी आकडेवारी समोर आली आहे.
जॉन होपकिंस यूनिवर्सिटीने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेत गेल्या 24 तासात कोरोनाचे तब्बल 66 हजार 528 नवीन रुग्ण आढळून आहेत.या देशातील हा आजपर्यंतचा सर्वात मोठा आकडा असून आता अमेरिकेतील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण ही संख्या 32 लाख 42 हजार इतकी झाली आहे.
अमेरिकेत कोरोनाने आपले जाळे मोठ्या प्रमाणावर विणले आहे. या देशामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आणि कोरोनामुळे मृत्यू होत असलेल्यांची संख्याही मोठी झाली वाढली आहे. नुसत्या अमेरिकेत आजपर्यंत 1 लाख 34 हजार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये अमेरिकेत coronavirus मुळे कोरोना बधितांचा आकडा हा हजारोंनी वाढत चालला आहे. ट्रम्प यांचे प्रतिस्पर्धी असणारे जो बायडेन यांना मास्क घातल्यावरुन खिजवणारे ट्रम्प आता स्वतः मास्क घालू लागले आहेत.
शनिवारी त्यांनी पहिल्यांदाच मास्क घालून वॉशिंग्टनच्या बाहेरील वाल्टर रीड सैन्य रुग्णालयात जखमी माजी सैनिकांना भेटण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांच्या तोंडावर आलेल्या मस्कबद्दल त्यांनी माहिती देताना मी मास्क वापरण्याच्या कधीही विरोधात नव्हतो. फक्त कधी आणि कुठे वापरायचा हे आपल्याला कळायला हवं, अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी माध्यमांशी बोलताना दिली. कोरोना विषाणूमुळे अमेरिकेत असणाऱ्या फ्लोरिडा राज्य सर्वात जास्त प्रभावित झाले असून 24 तासात फ्लोरिडामध्ये 15 हजारांपेक्षा अधिक कोरोनापीडित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे त्या त्या राज्यांमध्ये असणाऱ्या हॉटेल, पार्क, पब्स अशा ठिकाणी मास्क घालणे सक्तीचे केले गेले आहे. मात्र तरीही अमेरिकेत coronavirus चा इतका प्रादुर्भाव वाढत असताना अजूनही अनेक राज्यांमध्ये मास्क वापरणे बंधनकारक केलेले नाही हे विशेष.