कुरकुंभ : सहकारनामा ऑनलाईन (आलीम सय्यद)
दौंड तालुक्यातील कुरकुंभ परिसरात अजून एका व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉजीटिव्ह आला आहे.
कुरकुंभ येथे औद्योगिक वसाहत ही मोठी आहे. या औद्योगिक वसाहतीत एका कंपनीत कामगारास कोरोनाची बाधा झाली होती. परंतु आज कुरकुंभ गावातील शेवाळे प्लॉट मध्ये एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉजीटिव्ह आला आहे. तसेच या रुग्णाच्या संपर्कात असणाऱ्यांची कोरोना चाचणी उद्या करणार असल्याची माहिती कुरकुंभ वैद्यकीय अधिकारी राजेश पाखरे यांनी दिली .
या परिसरात कोरोना रुग्ण आढल्याने खळबळ उडाली असून चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.सदरचा परिसर ग्रामपंचायत कुरकुंभ यांनी सील केला आहे. त्यामुळे कोणीही घाबरू नये तोंडाला मास्क लावा , वारंवार सॅनिटायजर किंवा साबणाने हात स्वच्छ धुवावे , गर्दी टाळावी कोणीही विनाकारण बाहेर फिरू नये असे आवाहन कुरकुंभचे पोलीस पाटील रेश्मा विनोद शितोळे यांनी केले आहे.