Categories: Previos News

Corona – शहरात विना मास्क फिरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांवर दौंड पोलिसांची कारवाई



दौंड : सहकारनामा (अख्तर काझी)

शहर व परिसरामध्ये कोरोना चा पुन्हा फैलाव होवु लागल्याने दौंड पोलीस प्रशासन सतर्क झाल्याचे चित्र दिसत आहे, पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाने शहरात विना मास्क फिरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांकडून पोलिसांनी दंड वसूल करण्यास सुरुवात केली आहे तसेच अशा बेजबाबदार नागरिकांना ताकीद देण्याची मोहीमही पोलीस राबवित आहेत. 

शहर व परिसरामध्ये नव्याने कोरोना ग्रस्त रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे महामारी ने आपले डोके पुन्हा वर काढले असल्याचे दिसू लागले आहे.दि.26 फेब्रु रोजी येथील उपजिल्हा रुग्णालयाने केलेल्या कोरोना चाचणीमध्ये शहर व परिसरातील 61 पैकी 9 लोकांना संसर्ग झाल्याचे आढळून आल्याने प्रशासना बरोबरच दौंड करांची सुद्धा चिंता वाढली आहे.



त्यातच पाटस मधील एकाच कुटुंबातील तीन जणांना कोरोना मुळे आपला प्राण गमवावा लागला आहे, हे लक्षात घेता कोरोना चा आणखीन फैलाव होऊ नये यासाठी प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांनी सुद्धा प्रतिसाद दिला पाहिजे .मास्क, सॅनिटायझर वापरणे, सुरक्षित वावराचे नियम पाळणे, विनाकारण गर्दी न  करणे पुन्हा गरजेचे झाले आहे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. 



तरीसुद्धा जे नागरिक बेजबाबदार पणे वागत विना मास्क शहरात फिरत आहेत, संसर्ग पसरविण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत अशा लोकांकडून दौंड पोलिसांनी दंड वसुली सुरू केली आहे. दि. 18 फेब्रु.पासूनच पोलिसांनी अशा कारवाईला सुरुवात केली आहे, साधारणतः 70 ते 80 लोकांवर रोज कारवाई केली जात असून 10 ते 15 हजार रुपयांचा दंड रोज वसूल केला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

पो. नि. नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाने सहा. पो. निरीक्षक ऋषिकेश अधिकारी,पो. हवा. सुरेश चौधरी,पो. अंम. अमजद शेख,शेखर झाडबुके, किशोर वाघ यांच्या पथकाने कारवाई केली.

Sahkarnama

Recent Posts

‘ते’ विधान नंदू पवार यांच्याबद्दल नव्हतेच, ‘कुल’ कुटुंबाने त्यांचा कायम आदरच केला आहे – बाळासाहेब लाटकर

‘ते’ विधान नंदू पवार यांच्याबद्दल नव्हतेच, ‘कुल’ कुटुंबाने त्यांचा कायम आदरच केला आहे - बाळासाहेब…

4 तास ago

दौंड च्या पोलीस निरीक्षक पदी गोपाळ पवार यांची नियुक्ती

दौंडच्या पोलीस निरीक्षक पदी गोपाळ पवार यांची नियुक्ती

20 तास ago

निवडणुकी पुरते बाहेर पडणाऱ्या सिजनेबल पुढाऱ्यांकडे दुर्लक्ष करा | कुणाला काही टिका करू द्या, आपण आपल्या कामातून त्यांना उत्तरं देऊ – आमदार राहुल कुल

निवडणुकी पुरते बाहेर पडणाऱ्या सिजनेबल पुढाऱ्यांकडे दुर्लक्ष करा | कुणाला काही टिका करू द्या, आपण…

1 दिवस ago

प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांचा उद्या पिंपळगाव येथे मेळावा

प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांचा उद्या पिंपळगाव येथे मेळावा

2 दिवस ago

पिडीसीसी बँकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : मा.अध्यक्ष रमेश थोरात

पिडीसीसी बँकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : मा.अध्यक्ष रमेश थोरात

3 दिवस ago