Categories: Previos News

Corona : दौंड नगरपालिकेमध्ये पुन्हा ‛कोरोना’ ची एन्ट्री, सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)

दौंड शहर व परिसरातील कोरोनाचा प्रसार  थांबायचे नाव घेईना असे चित्र या ठिकाणी आहे. रोज बाधित रुग्णांची संख्या वाढते आहे. 

लोकवस्ती सह येथील तहसील कार्यालय, तालुका आरोग्य विभाग, बँका तसेच उपजिल्हा रुग्णालयात सुद्धा कोरोनाचा शिरकाव झालेला आहे, आणि आज तर कोरोनाने पुन्हा एकदा नगरपालिकेतील सफाई विभागात एन्ट्री केल्याने येथील सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

दि.24 रोजी उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने शहर व  परिसरातील 66 संशयितांची कोरोना तपासणी करण्यात आली, त्यापैकी 9 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून येथील सम्राट नगर येथे राहणाऱ्या एकाच कुटुंबातील चौघांना कोरोना संसर्गाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

22 ते 65 वर्ष वयोगटातील 2 महिला व 7 पुरुष रुग्णांचा यामध्ये समावेश आहे. शहरातील 7 तसेच ग्रामीण भागातील 2 रुग्णांना संसर्गाची बाधा झाली असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ संग्राम डांगे यांनी दिली आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

8 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

21 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

23 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago