Categories: Previos News

Corona : रेमडीसिवीर इंजेक्शन जास्त दराने विक्री करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, महिलेसह तिघांचा समावेश



पुणे : सहकारनामा ऑनलाईन

सध्या जगात कोरोनाच्या विषाणूने थैमान घातले आहे, त्यावर अजून तरी प्रभावी अशी लस सापडली नाही मात्र कोरोना रुग्णांना बऱ्यापैकी दिलासा देणाऱ्या रेमडीसीविर इंजेक्शनचे दर आता मनमानी पद्धतीने  वसूल केले जात असल्याची उदाहरणे समोर येत आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये असाच काहीसा प्रकार घडला असून यात सामील  असणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार हा प्रकार आकुर्डी येथील एका हॉस्पिटलमध्ये मागील ऑगस्ट महिण्यापासून 22 सप्टेंबर पर्यंत घडला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी शाहीद जब्बार शेख, विजय बबन रांजणे आणि वैष्णवी राजेंद्र टाकोरकर (सर्वजण रा. ओटा स्कीम, निगडी) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला असून मुस्तफा अब्दुल गफार तांबोळी यांनी या तिघांविरुद्ध फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी तांबोळी यांच्या आईला कोविड 19 च्या विषाणूची बाधा झाली होती. त्यामुळे त्यांना आकुर्डी येथील एका हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आले होते. यावेळी त्यांच्यावर उपचार करताना त्यांना रेमडीसिवीर इंजेक्शन लागत असल्याने त्यांना त्या हॉस्पीटलमध्ये काम करत असणारा शाहीद जब्बार शेख याने  रेमडीसिवीर इंन्जेक्शन मिळवले पण त्याच्याकडे विक्रीचा कुठलाही परवाना नसताना त्याने ते जास्त दराने रुगांच्या नातेवाईकांना विक्री केले. रेमडीसिवीर इंजेक्शनची मुळ किंमत 5,400/- पाच हजार चारशे रुपये असताना आरोपीने फिर्यादीकडून 2 इंजेक्शनचे सुमारे 15,500/- पंधरा हजार पाचशे रुपये घेत फिर्यादीची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

तसेच फिर्यादी यांच्या मित्राच्या वडिलांना देखील कोरोनाची लागण झाल्याने त्यांना त्याच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी देखील त्यांना देण्यात आलेले रेमडीसीवीर या इंजेक्शनची इंजेक्शनची 6000 सहा हजार रुपये पर इंजेक्शन या दराने विक्री करण्यात आली. याबाबत फिर्यादी यांनी निगडी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी संबंधित 3 जणांवर जीवनावश्यक वस्तू कायदा, औषध व सौंदर्य प्रसाधने कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पी.डी. आरदवाड करीत आहेत.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

26 मि. ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

14 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

15 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

17 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago