Corona : केडगाव येथील शासनाने अधिग्रहित केलेल्या रुग्णालयामध्ये व्हेंटिलेटर, ऑक्सिजेन, इंजेक्शनचा तुटवडा!



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख) 

दौंड तालुक्यातील केडगाव येथे कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी मोहन जनरल हॉस्पिटल शासनाकडून अधिग्रहित करण्यात आले आहे. मात्र येथे रुग्णाला लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू उपलब्ध होत नसल्याने येथे रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टरही बेजार झाले आहेत.

येथे रुगांना ऐनवेळी लागणारे इंजेक्शनचे शॉर्टेज आहे, व्हेंटिलेटर कमी पडत आहे,  ऑक्सिजनही कमी पडत असून रुग्णाला दवाखान्यापर्यंत पोहचविण्यासाठी लागणारी अँबुलेन्सही अजून उपलब्ध झालेली नाही. येथील रुगणालायचे डॉ.धिरेंद्र मोहन यांनी याबाबत या विभागाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना मेलकरून हि याची माहिती दिली असून प्रशासनाने त्वरीत इकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात सध्या कोरोनाचे बाधित रुग्ण अधिक प्रमाणात सापडत असून त्यातही केडगाव, पारगाव, यवत या पट्ट्यात सध्या मोठ्या प्रमाणावर कोरोना आपला इफेक्ट दाखवत असल्याचे समोर येत आहे.

कोरोना रुग्णांना त्वरित वैद्यकीय मदत मिळावी व त्यांच्यावर लागलीच उपचार व्हावेत यासाठी केडगाव येथील हे रुग्णालय अधिग्रहित करण्यात आले आहे. मात्र येथे व्हेंटिलेटर, इंजेक्शन आणि अँबुलेन्सचा तुटवडा जाणवत असल्याने डॉक्टरही निराश झाले आहेत, त्यामुळे शासनाने या ठिकाणी त्वरित वरील अत्यावश्यक सुविधा पुरविण्याची गरज आहे.