corona virus : 7 महिन्याच्या बाळासह आज ‛या’ 23 गावांतील 56 जणांना कोरोनाची बाधा, केडगाव, यवतमध्ये रुग्णसंख्या वाढली



| सहकारनामा |

दौंड : संचारबंदी आणि जमावबंदी केल्यानंतर कोरोना (corona virus) चा  प्रादुर्भाव कमी झाला आहे मात्र अजूनही विविध गावांत तुरळक रुग्ण सापडतच आहेत. सर्वात जास्त रुग्ण हे यवत आणि केडगाव परिसरात सापडत असून नागरिकांनी एक दुसऱ्यापासून सुरक्षित अंतर ठेवणे आता काळाची गरज बनली आहे.

आज सुमारे 23 गावांमध्ये 56 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. यामध्ये 39 पुरुष आणि 17 महिलांचा समावेश असून यात 7 महिन्याच्या बाळाचाही समावेश आहे.

यवत -9, खोर -2, केडगाव -7, देऊळगांगाडा -1, पिंपळगाव -2, भांडगाव -4, देलवाडी -2, चौफुला -1, कासुर्डी -7, खुटबाव -1, खामगाव -1, वरवंड -1, सहजपूर -2, जावजीबुवाचीवाडी -1,

 वाखारी -2, राहू -3,

 बोरीऐंदी -2, टेकवडी -2, तांबेवाडी -1,

 देवकरवाडी -1, नानगाव -1, नारायणबेट -1, बोरीपार्धी -1.

अशी गावनिहाय आकडेवारी आहे. नागरिकांनी जीवनावश्यक वस्तू खरेदी करताना सोशल डिस्टनसिंगचे पालन करावे, हात वारंवार साबणाने स्वच्छ धुवावेत, बाहेरून आल्यानंतर किंवा बाहेर असताना नाक आणि तोंडाला हाताने स्पर्श करू नये, मास्क आणि सॅनिटायजर चा वापर करावा असे आवाहन यवत ग्रामिण रुग्णालय, केडगाव प्राथमिक रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे.