Corona Virus – काळजी घ्या! दौंड तालुक्यातील 42 गावांत 161 कोरोना पॉझिटिव्ह



| सहकारनामा |


दौंड : दौंड तालुक्यामध्ये कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतत असल्याची बाब समाधानकारक असली तरी नवीन कोरोना  बाधित (Corona Virus) होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे त्यामुळे लोकांनी योग्य ती खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

दि. 24 एप्रिल रोजीचा अहवाल आज प्राप्त झाला असून या अहवालानुसार 42 गावांतील 161 जणांना कोरोनाची (Corona Virus) बाधा झाल्याचे समोर आले आहे. हा आकडा निश्चित विचार करायला लावणारा असून नागरिकांना जर कोरोनाची चेन तोडायची असेल तर घरात बसून राहणे हा एकमेव उपाय सध्या अंगीकारणे गरजेचे आहे.



गेल्या दोन दिवसांमध्ये कोरोना (Corona Virus) रुग्णांची संख्या कमी झाली होती. त्यामध्ये दि. 21 एप्रिल रोजी 140 पैकी फक्त 46 जण पॉझिटिव्ह आले होते तर दि. 22 एप्रिल रोजी 194 पैकी 86 जण पॉझिटिव्ह आले होते. मात्र दि. 24 एप्रिल रोजी 42 गावांतील 161 जण पॉझिटिव्ह आल्याने चिंता वाढली आहे.

त्यामुळे नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये, आणि घराबाहेर जाण्याची गरज असल्यास घराबाहेर पडताना तोंडाला मास्क लावणे अत्यंत गरजेचे असून गर्दीच्या ठिकाणी न जाता एक दुसऱ्यामध्ये किमान 6 फूट अंतर ठेवून बातचीत करणे, सॅनिटायजर चा वापर करणे, घरात आल्यानंतर साबणाने स्वच्छ हात धुणे इत्यादी उपाय काळाची गरज बनली आहे.