corona virus : उद्या केडगावचा आठवडे बाजार बंद



दौंड : सहकारनामा ऑनलाइन

‘कोरोना’ व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने राज्यातील शाळा, महाविद्यालय कोचिंग क्लासेस, स्विमींग पूल, चित्रपटगृहांवर निर्बंध जारी केले असून आता राज्यभरात आपत्ती व्यवसथापन कायदा लागू करण्यात आल्याने यामध्ये आता आठवडे बाजारांचाही समावेश आहे त्यामुळे उद्या मंगळवारी दौंड तालुक्यातील केडगाव येथे भरविण्यात येणारा आठवडे बाजार बाजाराही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती केडगाव ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी संदीप लांडगे आणि सरपंच अजितकुमार शेलार यांनी दिली.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून राज्यभरात आपत्ती व्यवसथापन कायदा लागू करण्यात आला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जागृती व दक्षताच्या सूचना देण्यात येत आहेत. जमावबंदी आदेशा लागू करण्यात आल्याने जिल्ह्यातील नियोजित सभा, व्याख्यानांसह सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले असून मंदिर, मशिदीतील धार्मिक कार्यक्रमांसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या शिवाय लग्न समारंभावरही निर्बंध जारी करण्यात आले असून मंगल कार्यालय चालकांना सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, आठवडे बाजार प्रतिबंधित करण्यात आल्याने उद्या भरणारा केडगावचा आठवडे बाजार रद्द करण्यात आला असल्याचे आवाहन केडगाव ग्रामपंचायतीकडून करण्यात आले असून नागरिकांनी याचे पालन करावे अशी सूचना देण्यात आली आहे.