Corona Virus : दौंडकरांनो आतातरी सावध व्हा, काळजी घ्या, अन्यथा…



दौंड : सहकारनामा ऑनलाईन

सर्वत्र कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोरोनाबाबत शासनाने ठरवून दिलेल्या नियमावलीला अनेक ठिकाणी नागरिकांनी गंभीरपणे न घेतल्याने आता त्याचा प्रसार झपाट्याने वाढू लागला आहे.

आत्तापर्यंत कोरोनामुक्त असलेले दौंड आता मात्र कोरोनाच्या विळख्यात सापडत चालले आहे. नुकताच दौंड शहरामध्ये आढळलेला स्थानिक कोरोनाबाधित रुग्ण हे त्याचे उदाहरण असून आता त्याच्या संपर्कात आलेल्या अन्य दोन जनांनाही त्याची लागण झाली आहे. हा कोरोनाबाधित रुग्ण वयस्क असून त्याच्या संपर्कात आलेल्या त्याची पत्नी व नातवालाही कोरोनाची बाधा झाली आहे त्यामुळे आता दौंड शहर आणि तालुक्यातील नागरिकांनी सतर्क होण्याची वेळ आली आहे. आपले कर्तव्य बजावून आलेले एस.आर.पी.चे अनेक जवानाही कोरोना पॉझिटिव्ह सापडत आहेत. मात्र त्यांची वेळीच चाचणी करून त्यांच्यावर उपचार केल्याने ते बरेही होत आहेत अशी माहिती दौंड येथील उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी दिली आहे.