Categories: Previos News

Corona Update : ‛दौंड’चा युवा वर्ग कोरोना च्या विळख्यात, शहरातील बाधित रुग्णांमध्ये तरुणांची संख्या लक्षणीय



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)

दौंड शहरातील तरुणाई कोरोनाच्या विळख्यात सापडत असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. शहरातील बाधित रुग्णांमध्ये तरुणांचा भरणा जास्त असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे येथील युवा वर्गाने आपल्या जीवन शैलीत तात्पुरता का होईना बदल करणे गरजेचे झाले आहे.

कोरोना संसर्गाची भीती न बाळगता बिनधास्तपणे गटाने सहलीच्या ठिकाणी भटकंतीला जाणे, गॅंग जमवून वाढदिवस साजरा करणे असे जीवावर बेतणारे कार्यक्रम युवा वर्गाने टाळलेच पाहिजेत असे येथील रुग्णांची वाढती संख्या पाहून वाटते.

शहरातील कोरोना ची भयावह परिस्थिती पाहून दौंड करांनी काहीतरी बोध घेणे आवश्यक आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या दिनांक 25 रोजीच्या कोरोना तपासणी अहवाला नुसार शहरातील 19 ते 38 वर्ष वयोगटातील 7 जणांना कोरोनाची लागण झाली आली असल्याचे समजते, त्यामुळे येथील युवा वर्गाने कमीत कमी आपल्या घरातील वृद्धांचा, बच्चे कंपनीचा विचार करून आपल्या वागण्यात बदल केला पाहिजे.

शहरातील सुरू असलेली बाजारपेठ व रस्त्यांवरील वर्दळ पाहता या गावामध्ये कोरोना चा लवलेश सुद्धा नसेल असे वाटते परंतु जेव्हा कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू असणाऱ्या दवाखान्यांमध्ये फेरफटका मारला असता फुल झालेले बेड पाहून या शहरातील कोरोनाची परिस्थिती किती भयंकर आहे याचा अनुभव येतो. 

उपजिल्हा रुग्णालयामध्ये बाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर दांपत्यास कोरोना होतो आणि त्यांना त्यांच्याच दवाखान्यामध्ये उपचार घेण्यासाठी जागा मिळत नाही यावरून येथील कोरोना परिस्थिती किती नियंत्रणाबाहेर गेली आहे याचा विचार दौंडकरांनी करावा. कोरोनाची लढाई फक्त प्रशासनाची नसून दौंडकरांची सुद्धा आहे हे प्रत्येकाने लक्षात घेणे आवश्यक झाले आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

15 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago