दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)
करोना महामारी ने संपूर्ण शहरच व्यापले असल्याचे चित्र समोर येत आहे. शहरातील बाधित रुग्णांच्या संपर्कातील एकूण ४८ जणांचे स्त्राव मंगळवारी(दि.21) प्रयोगशाळेत तपासणी साठी पाठविण्यात आले होते त्यापैकी सात जणांचा अहवाल हा पॉझिटिव्ह आल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली आहे.
शहरातील 5 महिला व दोन पुरुषांना करोनाची लागण झाली आहे. भीम नगर, कुंभार गल्ली, बंगला साईड, उपजिल्हा रुग्णालय, फादर हायस्कूल, शिवाजीनगर या परिसरातील रुग्णांचा बाधितां मध्ये समावेश आहे. या शिवाय सोनवडी येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शहरातील वाढती रुग्ण संख्या पाहता नागरिकांनी शहरांमध्ये गर्दी न करता सोशल डिस्टनसिंग पाळणे, बाहेर पडताना तोंडाला मास्क लावणे,सॅनिटीझर चा वापर करणे आदि उपाय अंगिकारले पाहिजे असे प्रशासन वारंवार आवाहन करीत आहे. त्याचे पालन सर्वांनी केले तरच करोना चा संसर्ग रोखला जाईल.