Corona Update खाजगी लॅबमध्ये पॉझिटिव्ह आलेल्या केडगावच्या ‛त्या’ तरुणाचा आला सरकारी रिपोर्ट, जाणून घ्या सत्यता



दौंड : सहकारनामा ऑनलाइन (अब्बास शेख)

दौंड तालुक्यातील केडगाव येथे रहिवासी असणाऱ्या त्या तरुणाचा सरकारी लॅबमध्ये चेक केलेला रिपोर्ट आला असून प्रायव्हेट लॅबमध्ये पॉझिटिव्ह असलेल्या तरुणाचा सरकारी लॅबमध्ये निगेटिव्ह रिपोर्ट आला आहे. निगेटिव्ह आलेल्या रिपोर्टमुळे या तरुणासह त्याच्या कुटुंबियांचाही जीव भांड्यात पडला आहे. हा तरुण निगेटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक रासगे यांनी ‛सहकारनामा’ला दिली.

या तरुणासह त्याच्या घरातील इतरही कुटुंबियांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते मात्र हे सर्वजण निगेटिव्ह आल्याने या परिवाराच्या चिंता मिटल्या आहेत तर बंदी घालण्यात आलेल्या  या खाजगी लॅबच्या रिपोर्टमुळे आता सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये खाजगी लॅबबद्दल प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे.