Corona Update : दौंड शहरातही कोरोना रुग्ण घटले, आज 232 पैकी फक्त 50 पॉझिटिव्ह



| सहकारनामा |

दौंड : दौंड तालुक्यातील ग्रामिण भागामध्ये सध्या कोरोना रुग्णांची संख्या घटत असताना दौंड शहरातूनही कोरोना रुग्ण घटत असल्याचे आजच्या अहवालातून समोर आले आहे.



आज दौंड शहर आणि परीसरातील 232 जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली त्यामध्ये जवळपास 80% म्हणजे 182 रुग्ण निगेटिव्ह आले तर अवघे 21% म्हणजे 50 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. याबाबतची माहिती दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी दिली आहे.



दौंड शहर आणि परिसरातील वर नमूद केलेल्या प्रभागातील आणि गावांतील लोक हे पॉझिटिव्ह आले आहेत.