corona update : कोरोनाचा वेग मंदावला! मात्र संसर्ग सुरूच, आज 23 गावांत 57 पॉझिटिव्ह



| सहकारनामा |

दौंड : राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर राज्य सरकारने संचारबंदी, जमावबंदी आणि लॉकडाउन सारखे उपाय लागलीच अवलंबिले आणि त्यामुळे समूह संसर्गाला आळा बसण्यास मोठी मदत झाली आहे. 

मात्र तरीही कोरोना संसर्गाचा धोका मात्र कमी झालेला नाही त्यामुळे नागरिकांनी सोशल डिस्टनसिंग चे पालन करणे खूपच गरजेचे बनले आहे. दौंड तालुक्यातील कोरोनाचा वाढीचा वेग काही अंशी कमी झाला असल्याचे आकडेवारीवरून दिसत असले तरीही कोरोनाचा संसर्ग मात्र कमी झाल्याचे दिसत नाही. 

त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे बनले आहे. आज दौंड तालुक्यातील 23 गावांमध्ये 57 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत. दि. 11/5/2021 रोजी यवत ग्रामिण रुग्णालयाच्या वतीने 23 गावांतील 207 लोकांचे स्वॅब प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते.

या 207 स्वॅब पैकी 55 जण पॉझिटिव्ह आले आहेत तर 142 जण निगेटिव्ह आले आहेत. यातील 8 जणांचे अहवाल अजून येणे बाकी आहे. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये 36 पुरुष आणि 21 महिलांचा समावेश आहे.

पॉझिटिव्ह आलेल्या 23 गावांमध्ये यवत -3, सहजपूर -3, भांडगाव -6, केडगाव -4, बोरीपर्धी -1, खोर -5, दौंड -1, राहू -4, वाखारी -4, वाळकी -1,, सोनगाव -1, मीरवडी -1, वडगाव रसई- 1, नांदूर – 1, वरवंड, -4, पानवली -3, कासुर्डी -2, नाथाचीवाडी -1, पिंपळगाव -4, खामगाव -1, देलवाडी -3, बोरीभडक – 2, डोम्बेवाडी – 1 असे 23 गावांतील 57 जण पॉझिटिव्ह आले आहेत.